ताज्या घडामोडी

महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना दादा साहेब गायकवाड नाशिक विमानतळ नामकरण समिती वतीने निवेदन सादर,

महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना दादा साहेब गायकवाड नाशिक विमानतळ नामकरण समिती वतीने निवेदन सादर,

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक-:कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ(ओझर) नामकरण समितीच्या शिष्टमंडळाद्वारे महाराष्ट्र राज्य कृषिमंत्री नाशिक(मालेगाव) चे आमदार दादा जी भुसे यांची भेट घेऊन ओझर येथील विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देणेबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व राज्य सरकार कडे पाठपुरावा करावा अश्या मागणी चे निवेदन कृषीमंत्री दादाजी भुसे यांना सादर करण्यात आले.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे ओझर एच.एल.येथील कारखाना उभारणीचे योगदान हे सर्वसृतच आहे याची जाणीव असल्याने कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद
देऊन महाराष्ट्र राज्य सरकारकडे मी स्वतः पाठपुरावा करून नामकरणाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
शिष्टमंडळात सर्वश्री समितीचे मुख्य निमंत्रक रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे , देवळाली कॅन्टोमेन्ट बोर्ङ उपध्यक्ष विलास पवार, समाजभुषण बाळासाहेब शिंदे ,भारीप नेते दिपचंद दोंदे ,मदन शिंदे ,आदेश पगारे, बाळासाहेब साळवे ,पंडित नेटावटे,प्रशांत कटारे ,पत्रकार सतीश रुपवते आदी उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close