ताज्या घडामोडी

कोल्हापूर ,शाहुवाडी तालुक्यात दोन यांत्रिकी बोटी सज्ज.. 21 गावांमधील 365 कुटुंबाने केले स्थलांतरित

उपसंपादक राज्य :अफजल देवळेकर सरकार ,

कोल्हापूर ,शाहुवाडी तालुक्यात दोन यांत्रिकी बोटी सज्ज.. 21 गावांमधील 365 कुटुंबाने केले स्थलांतरित
शाहुवाडी तालुक्यामध्ये येत्या दोन दिवसात हवामान खात्याने जोरदार पाऊस येण्याचे वर्तविली असून नदीकाठी ओढ्याकाठी राहणाऱ्या लोकांनी स्थलांतरित व्हावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
अतिवृष्टीच्या काळात लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती विभाग पूर्णपणे सज्ज असून शाहुवाडी तालुक्यांमध्ये दोन यांत्रिकी बोटी कार्यरत आहेत काल 21 गावांमधील 365 कुटुंबांना स्थलांतरीत केले असून काल करंजफेन भागातील ते 33 लोक व 21 मेंढ्यांना रेस्क्यू करून पाण्याबाहेर काढले तर बांबवडे येथे एका कुटुंबाला रेस्क्यू करून पाण्याबाहेर काढले तसेच मलकापूर येथील एक कुटुंब ही आज रेस्क्यू करून काढले. 23 जुलै 24 जुलैपर्यंत हवामान खात्याने जोरदार पाऊस पडणार असल्याची वर्तवले आहे. लोकांनी काळजी घ्यावी शासकीय यंत्रणा सर्व परीने सज्ज आहे लोकांनी केव्हाही कधीही नैसर्गिक आपत्ती कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले . रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग आंबा लव्हाळा नजीक पाण्याखाली गेल्याने तो मार्ग बंद असून दरम्यान करंजफेन येथील नदीला पाणी आल्यामुळे तिकडील गावाशी ही तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे . त्याच बरोबर तुरुकवाडी रेठरे मालेवाडी उकळू या भागातील ही नदीचे पाणी आल्यामुळे तालुक्याची संपर्क तुटला आहे . बांबवडे येथील अंभीरा त ओढ्याचे पाणी पात्राबाहेर आल्याने येते ही गैरसोय निर्माण झाली आहे. तसेच शिरगाव सवते शिंपे या मार्गावरील रस्ताही पाण्याखाली गेलेला आहे. दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने जनजीवन काही काळासाठी विस्कळित झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close