ताज्या घडामोडी

राष्ट्रवादीचे भुषण पाटील याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने संपन्न

राष्ट्रवादीचे भुषण पाटील याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने संपन्न

         खालापूर – समाधान दिसले      

खालापूर : खालापूर तालुक्यामधील ग्रामीण खानाव खेडेगावातील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भुषण सुर्यकांत पाटील यांनी 22 जुलै रोजी आपल्या वाढदिवस दिनी कोणताही अवाढव्य व वायफळ खर्च न करताना सामाजिक उपक्रम हाती घेत गोरगरिबांना मदतीचा हात दिल्याने भुषण पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक होत असून यावेळी गोरगरिब जनतेच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाले तर रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भुषण पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

खालापूर तालुक्यात कोरोना लॉकडाऊन काळात अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे असताना काळात गोरगरीबांना मदतीचा हात मिळावा म्हणून शासन स्तरासह सर्वच स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आल्या असताना शासनाला सहकार्य व्हावे आणि गोरगरीबांना मदत मिळावी म्हणुन सामाजिक कार्यकर्ते तथा रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भूषण पाटील व खानाव ग्रामपंचायत सदस्या कामिनी भूषण पाटील या दांपत्याच्या वतीने यांनी स्वखर्चाने अन्न धान्य वाटपासह संपूर्ण गावात सँनिटाइझर वाटप, गावामध्ये सँनिटाइझर फवारणी करीत सामाजिक बांधिलकी जपली होती, तोच सामाजिक कार्याचा वसा पुढे कायम ठेवून पाटील कुटुंबाने 22 जुलै रोजी रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भुषण सुर्यकांत पाटील याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिवनावश्यक वस्तुंचे वाटप, छत्री वाटपासह घरगुती आटा चक्की (गिरण) 50 % सवलतीमध्ये वाटप करण्यात आल्याने पाटील यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

याप्रसंगी जि.प.सदस्य नरेश पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे, युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा देवन्हावे सरपंच अंकीत साखरे, खानावच्या सदस्या कामिनी भुषण पाटील याप्रमुखासह मोठ्या संख्येने खानाव ग्रामस्थ, आदिवासी बांधव उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close