ताज्या घडामोडी

गुरुपौर्णिमा निम्मित सहज आपल्यासाठी…*

*गुरुपौर्णिमा निम्मित सहज आपल्यासाठी…*

नाव- प्रकाश भाई
हुद्दा- रिलायन्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष
वय- ४६ वर्ष
पगार-७५ कोटी रु प्रति महिना
इतर भत्ते-२०कोटी प्रति महिना

मुकेश अंबानीचा उजवा हात, उच्च विद्याविभूषित, सगळी सुखं पायाशी

दि ३० एप्रिल २०२१ ला जैन पंथाची दिक्षा घेऊन पुढील जीवन हे मुनी म्हणून भिक्षा मागुन जगणार!
अनवाणी पायाने तीर्थयात्रा करणार.
अपरिग्रह करून संपूर्ण जीवन भगवत प्राप्तीसाठी वाहून घेणार.
आधीच एकुलत्या एक मुलाने ५ वर्षांपूर्वी जैन दिक्षा घेऊन संन्यास घेतलेला.
काय हा त्याग!! काय ही शिकवण!!।काय ही भावना!!

कितीही कौतुक केले,आदर केला तरी कमीच.

एकदा आपला स्वतःचा आरसा पाहूया!! यांच्या मानाने आपण तर अगदीच क्षुल्लक, किरकोळ परंतु अहंकाराने,गर्वाने फुगलेलो.

नश्वर संसारात राहून आपण खूप कोणीतरी मोठे आहोत, स्पेशल आहोत हा आपला अविर्भाव….परमेश्वर प्राप्तीला दुय्यम महत्व आणि संसाराठी वाट्टेल ते कष्ट घ्यायला तयार. काय हे अज्ञान…

#तात्पर्य#

जीवनाचा परमअर्थ आणि मनुष्य देहाचे मुळ कारण ज्याच्या लक्षात आले, तो अनंत सत्ताधीश भगवंताच्या प्राप्तीसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करतो. अशा भक्ताला या नश्वर जगातील धन, मान, प्रतिष्ठा मातीसमान तुच्छ वाटतात. परमात्मा प्राप्ती हेच त्याच्या जीवनाचे मूळ लक्ष बनते.

*असं काही बघितल्यावर आपोआप नतमस्तक व्हावं वाटतं…*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close