ताज्या घडामोडी

पाल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आश्रमात भाविकांच्या अनुपस्थितीत होणार गुरुदेव पादुका पूजन कार्यक्रम : मात्र ऑनलाईन सत्संगची व्यवस्था*

*पाल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आश्रमात भाविकांच्या अनुपस्थितीत होणार गुरुदेव पादुका पूजन कार्यक्रम : मात्र ऑनलाईन सत्संगची व्यवस्था*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सातपुड्याच्या कुशीत असलेल्या पाल येथे सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम वृंदावन धाम मध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही दि.२३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे आयोजन केले होते.

परंतु कुरूना महामारीचा काळ सुरू असल्याने शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करीत थेट भाविकांच्या अनुपस्थितीत पाल आश्रमाचे विद्यमान गादीपती श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज व ब्रह्मचारी निवासी संत यांच्या शुभहस्ते पूज्य बापूजी च्या समाधीस्थळी सकाळी गुरुदेवांच्या पादुका पूजन करण्यात आले असून त्यानंतर माहिती व तंत्रज्ञानाच्या उपयोग करून लाखो अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारा करिता थेट चैतन्य चैनल व युट्युब च्या माध्यमातून ऑनलाइन सत्संगची सुविधा केलेली असून सर्वांना या अमृतांचा लाभ गादीपती श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या अमृतवाणीतून मिळणार असून सदरची गुरुपौर्णिमा भाविकांनी आपापल्या घरी साजरी करून या ऑनलाईन पवित्र सत्संग कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान येथील समितीतर्फे करण्यात आले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close