ताज्या घडामोडी

15 ऑगस्ट स्वंतंत्र दिनी शासकीय जत्रेत दिव्यांगाना मिळणार अंत्योदय शिधापत्रिका*.

*15 ऑगस्ट स्वंतंत्र दिनी शासकीय जत्रेत दिव्यांगाना मिळणार अंत्योदय शिधापत्रिका*. *भारती* *धिंगान,नाशिक*
प्रहार अपंग क्रांती आंदोलन नांदगाव तालुक्याच्या वतीने नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली दिनांक 22जुलै रोजी नांदगाव तहसिल कार्यालया समोर दिव्यांग व विधवांना अंत्योदय शिधापत्रीका मिळाव्यात व प्रलंबित असलेल्या संजय गांधी निराधार योजना मार्गी लागावी या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले…
दिव्यांगांनी आंदोलना समई जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला….
नांदगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कातकडे साहेब यांच्या मध्यस्थीने तहसीलदार उदय कुलकर्णी साहेब व आंदोलक यांच्यांत बैठक घेऊन तहसीलदार साहेबांनी सर्व मागण्या मान्य करत येत्या पंधरा आॅगस्ट स्वंतंत्र दिनी नांदगाव येथे शासकीय जत्रा लाऊन त्याच दिवसी सर्व च्या सर्व
दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिका वाटप करण्यात येणार आहे.. तसेच प्रलंबित असलेले संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे मार्गी लावणार असे लेखी आश्र्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले…
या आंदोलनाला रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर भाई धिवर, तालुका अध्यक्ष देवीदास मोरे यांनी पाठींबा दर्शवून मार्गदर्शन केले.
आंदोलनाला राज्य सन्मेवेक संध्याताई जाधव,जिल्हा विभागीय अध्यक्ष नरेंद्र खैरणार चंद्रभान गांगुर्डे, तालुका अध्यक्ष अनिस भाई शेख, मनमाड शहर अध्यक्ष जाफर शहा, नांदगाव शहर अध्यक्ष राजु कटारे, महिला प्रमुख संगिता सांगळे,शिला हरकल, दिपक सोळसे, ज्ञानेश्वर मुकुंद, उपेंद्र पाल,आर्चना आव्हाड,हिना बागवान, नांदगाव, मनमाड,न्यायडोंगरी आदी ग्रामिण भागातील प्रहार सैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close