ताज्या घडामोडी

सावदा पालिकेच्या हद्दीतील त्या भागात अखेर रस्ता खडीकरणाच्या कामाची झाली सुरूवात: पोलीस टाईम न्युजच्या बातमीची दखल*

*सावदा पालिकेच्या हद्दीतील त्या भागात अखेर रस्ता खडीकरणाच्या कामाची झाली सुरूवात: पोलीस टाईम न्युजच्या बातमीची दखल*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात पालिका हद्दीतील गौसियानगर सह विविध भागात जवळपास गेल्या पंधरा वर्षांपासून गटारी, रस्ते नव्हते दरवर्षी पावसाळ्यात येथील रहिवासी शाळकरी मुलां सह नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करीत कामानिमित्त बाहेर जावे लागते सदर भागात सर्वत्र ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात चिखलमय परिस्थिती असते जागोजागी पावसाळ्याचे पाणी साचलेले असतात यामुळे येथील परिसरात डांस, मच्छर, विषारी किडे कट कुल यांची उत्पत्ती होऊन येथील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत असते म्हणूनच

“सावदा पालिकेच्या हद्दीतील गैसियानगर सह विविध भागात खड्ड्यात गेले रस्ते: विकास झाला मिसिंग.” या मथळ्याखाली दि. २१/७/२०२१ रोजी सविस्तर बातमी पोलीस टाईम न्युज मध्ये प्रकाशित करण्यात आली असता याची पालिका प्रशासनाने थेट दखल घेऊन गौसिया नगर सह विविध भागात रस्ता खडीकरणाच्या कामाची सुरुवात केलेली आहे.

सदरील परिसरामधील समस्या बाबत वेळोवेळी आवाज उठवून बातम्या प्रसारित केल्याने येथील रहिवासी व इतिहाद एज्युकेशन सोसायटी सावदा चे अध्यक्ष अकबर खान अमानुल्ला खान, शेख शकील शेख हमीद चौधरी, मोसिन खान मुस्तफा खान उर्फ ५१, सुरेश तायडे, युनुस भैय्या, शकील किराणा सह महिलांनी सुद्धा पोलीस टाईम न्युजचे आभार मानले तसेच सदर परिसराकडे पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेले काम पाहुन नागरिकांनी समाधान व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close