ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील नागडे या गावी, लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखेपाटील,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचलित कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी, येथे शिक्षण घेत असलेली कृषीकन्या कु.प्रांजल गणेश खैरे यांचे आगमन झाले,गावातील प्रतिष्ठीत गावकरी व शेतकरी यांनी तिचे स्वागत केले.

संस्थेचे कृषी शिक्षण संचालक श्री भारत घोगरे, प्राचार्य श्री निलेश दळे, कार्यक्रम समन्वयक प्रा.श्री रमेश जाधव,प्रा. प्रियांका दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या कु.प्रांजल खैरे शेतकऱ्यांचे अनुभव जाणून, त्यांना मार्गदर्शन करणार आहे.दहा आठवड्यातील कालावधीत शेतातील माती परीक्षण,फळबाग लागवड, आत्मिक कीड,रोग व्यवस्थापन बीजक्रिया, शेतातील अवजारांचा वापर,शेतीचे आर्थिक नियोजन,जनावरांचे लसीकरण आदीं बाबत शेतकऱ्या सोबत संवाद साधणार असून आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करणार आहे.
या वेळी गावचे सरपंच मा.सौ प्रगतीताई साताळकर,ग्रामसेवक वाय. व्ही.बागुल, भारतभाऊ भावसार,गणेश खैरे, प्रशांत साळी, संदीप वाबळे, अथर्व खैरे , मुकेश लचके उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close