ताज्या घडामोडी

सावदा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महापुजा*

* येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महापुजा*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :-महाराष्ट्र राज्यात सर्वत्र ठिकाणी आज आषाढी एकादशी दिवशीचे निमित्ताने प्रत्येक गावी प्रत्येक विठ्ठल मंदिरात पूजा साजरी करण्यात आली. याचे निमित्त साधून जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात विठ्ठल मंदिर मध्ये महापूजा वै.जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे गादीपती ह.भ.प.धनराज महाराज अंजाळेकर यांचे म्हणणेशुभ हस्ते करण्यात आली.गांधी चौकातील सतीश महाराज जोशी यांनी पुजा पठन केले. यावेळी शहरातील शेकङो भक्तगण हजर होते. सदरची शुभ व पवित्र आरती झाल्यानंतर १ क्वींटल २५ किलो साबुदाणा खिचडी चे वाटप ही करण्यात आले,तसेच त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन यांचे कङून १० कॅरेट केळीचे ,व पेढे, राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले.या वेळी शहरातील बांधवांचे सहकार्य लाभले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close