ताज्या घडामोडी

नाशिक महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक पीठासन अधिकारी तथा मा.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत पार पडली.

नाशिक महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक पीठासन अधिकारी तथा मा.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, स्थायी समिती सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहाही प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये पंचवटी प्रभाग समिती सभापतीपदी मच्छिंद्र सानप,पूर्व प्रभाग समिती सभापतीपदी डॉ.दिपाली कुलकर्णी,नाशिक पश्चिम प्रभाग समिती सभापतीपदी वत्सला खैरे , नवीन नाशिक प्रभाग सभापती पदी सुवर्णा मटाले,सातपूर प्रभाग समिती सभापती पदी योगेश शेवरे व नाशिकरोड प्रभाग समिती सभापती पदी प्रशांत दिवे यांची निवड केल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा मा.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केली.यावेळी नगरसचिव राजू कुटे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. यानंतर या सर्व सभापतींचा सत्कार पीठासन अधिकारी तथा मा.जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केला.
तसेच मा.मनपा पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापती यांचा सत्कार केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close