ताज्या घडामोडी

मंदिरे,धर्म,संस्कृती टिकवण्याबरोबर नमोकर तिर्थक्षेत्र यांचे कडून ४९३ दिव्यांगाना मिळणार मोठा आधार.*

*मंदिरे,धर्म,संस्कृती टिकवण्याबरोबर नमोकर तिर्थक्षेत्र यांचे कडून ४९३ दिव्यांगाना मिळणार मोठा आधार.*

   चांदवड: सुनिलअण्णा सोनवणे       

णमोकार तीर्थ चांदवड येथील पूज्य आचार्य देवनंदिजी महाराज गुरूभक्त परिवार व साधु वासवानी मिशन , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गरजू अपंग लोकांसाठी मोफत कृत्रिम पाय व हात शिबीर आयोजित केले होते ते अतिशय शांततेत व नियम बद्ध नियोजित कार्यक्रम संपन्न झाला आहे . सदर कृत्रिम पाय व हात अद्यावत तंत्रज्ञानाने बनविनार असून ते फायवरचे आहे, वजनास अत्यंत हलके मात्र टिकावू व मजबूत असून प्रत्यारोपण केल्यानंतर अपंग व्यक्ती चालू शकते , सायकल चालवू शकते , टेकडी सुध्दा चढू शकते तसेच सर्व दैनंदिन कामे करू शकते या प्रमाणे आज प्रेतेक दिव्यांग व्यक्तीची माहिती व अपंगत्वाचे त्या अवयवाचे मोजमाप करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातुन अनेक जिल्ह्यातील नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली.यावेळी १ वर्षपासून ते वृद्ध व्यक्तींन पर्यन्त सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्री रूग्णांचे मधुमेहामुळे , गगरीनमुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या अपघातामुळे हात व पाय गमावले गेले असतील अशा सर्व रुग्णांना मोफत हात – पाय बसविण्यासाठी वासवाणी मिशनचे स्वयंसेवक मिलिंद जाधव, सुशील ढगे, साहिल जैन, राहुल सरोज, ज्ञानेश्वर पाटील आदींनी सलग नऊ तासात ५०८ दिव्यांग रुग्णांची तपासणी केली. त्यात ४९३ दिव्यांग रुग्णांची तुटलेले हाथ, पाय बसविण्यासाठी मापे घेण्यात आले यांनी या कामासाठी मोठी मेहनत घेतली आहे.या कार्यक्रमासाठी नाशिक भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, शिवसेना जिल्हाउपप्रमुख नितीन आहेर, शिवसेना नेते कारभारी आहेर,जिल्हा परिषद सदस्य, धाकराव, णमोकार तिर्थ क्षेत्र येथिल सेविका,वैशाली दीदी,राकेश जैन, व ट्रस्टी,यांनी भेट दिली व कार्यक्रम शुभेच्छा दिल्या. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून जी तपासणी करून मोजमापे घेण्यात आली व तयार झालेले कृत्रिम पाय व हात हे आधी संबंधित व्यक्तीला संपर्क करून दिले जाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून कळविले जाईल तसेच त्यासाठी लाभार्थ्यांना पुन्हा बोलविण्यात येईल व वाटप करण्यात येईल अशी माहिती णमोकार आचार्य श्री.देवनंदजी गुरुदेव यांनी दिव्यांग बंधु बघिनींना आशीर्वाद देतांना सांगितले.यावेळी नियोजन केलेले ओमजी पाटणी, पिंटू संचेती पूनम संचेती,डॉ.मनोज छाजेड,विनोद पाटणी,महावीर छाजेड,संजय छाजेड, सुजन ओस्तवाल, कुणाल रहाणे, प्रकाश साबळे, तेजस रहाणे,निलेश अजमेरा, दर्शन अजमेरा, योगेश अजमेरा, राजेंद्र अजमेरा, वर्धमान पांडे,कमलेश अजमेरा, पवन पाटणी, जीवन पाटणी, दीपक गादीया, हरिश्चंद्र ठाकरे, रोहित देव, पवन प्रजापत, निलेश जाधव, विलास रहाणे,मुकेश भिडे, नितीन फंगाळ व जैन नवयुवक मंडळ वडाळीभोई आदींनी परिश्रम घेतले.*

  दिव्यांग नागरिकांनीही केले रक्तदान*

यात प्रमुख दिव्यांग व्यक्तींचा रक्तदान कॅम्प झाला असून यावेळी एकूण 34 बॅग जमा झाल्या मी अपंग असूनही रक्तदान करणार या संकल्पनेतून करुणा सारख्या यामहा मारीत कोणाचा तरी प्राण वाचेल या संकल्पनेतून रक्तदान करण्यासाठी या कॅम्पमध्ये 13 दिव्यांग व्यक्तींनी आपला सहभाग नोंदविला यावेळी यांनी आम्हाला जर ज्या वस्तू इतक्या महाग असून सुद्धा फ्री मध्ये मिळत असेल तर आम्ही दुसऱ्याच्या जीवासाठी रक्तदान का करू शकत नाही असे आम्ही रक्तदान करू आणि कोणाचा तरी प्राण वाचू ही संकल्पना जोपासली यावेळी अर्पण पतपेढी नाशिक व डॉक्टर अतुल जैन नितीन जैन नेहा कारभारी अंजली समर्थ आरती शिरसाट अपर्णा काळे लक्ष्मी राणे कांचन पिंगळे शुभांगी चंद्रवंशी शितल सोलंके सोपान कांडेकर कस्तुब विभूते व इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close