ताज्या घडामोडी

शिवसंपर्क अभियाना अंतर्गत आढावा बैठक ; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा उदय सामंत यांची उपस्थिती…

शिवसंपर्क अभियाना अंतर्गत आढावा बैठक ;
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा उदय सामंत यांची उपस्थिती…

               नेरळ : दिपक बोराडे            

शिवसेनेचे संपूर्ण महाराष्ट्रात शिव संपर्क अभियान चालू आहे या अभियाना अंतर्गत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठक रविवारी 18 जुलै ला सुरभी हॉल, पोसरी येथे संपन्न झाली या कार्यक्रमासाठी या महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांसह कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना मंत्री महोदयांनी आमदार महेंद्र थोरवे यांनी कमी कालावधीत केलेल्या विकास कामांचे कौतुक केले. शिवसैनिकांना संबोधित करत असताना ते म्हणाले की जसा महाविकास आघाडीतील प्रत्त्येक घटक पक्षाला स्वतःची पक्ष संघटना मजबूत करण्याचा अधिकार आहे तसा शिवसेना पक्ष वाढीसाठी मुख्यमंत्री त्या अधिकारानुसार शिवसंपर्क अभिनयान राबवित आहे. शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला बरंच काही दिलं परंतु आपण शिवसैनिक पक्षासाठी काय योगदान देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. भविष्यकाळात मी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या नात्याने आपल्याला या मतदार संघात कोणतेही नवीन कॉलेज काढायचे असेल तर सर्वतोपरी मदत करेन असे आश्वासन दिले…
यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूर मतदार संघा मधील मंजूर केलेल्या विकास कामांची आठवण पुन्हा एकदा करून दिली. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे कुटुंब प्रमुख म्हणून काम करत आहेत त्यांचे विचार घराघरात पोहचविणे हे आपल्या सर्व शिवसैनिकांचे कर्तव्य आहे आणि आपल्याला त्याचा सर्वस्वी अभिमान आहे असे मत व्यक्त केले.
या संपर्क अभियाना अंतर्गत सुनील भालीवडे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य,विलास श्रीखंडे-मा रायगड जिल्हा सहसंयोजक, मंगेश काळोखे भाजपा कार्यकर्ते,मशिंदर पादीर- भाजप कार्यकर्ते,
शिंगोले- तसेच भाजप कळंब जि प विभाग प्रमुख , पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी रायगड जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील,उपजिल्हाप्रमुख भाई गायकर ,महिला जिल्हा संघटिका रेखाताई ठाकरे , सल्लागार भरत भाई भगत विधानसभा संघटक संतोष शेठ भोईर , जिल्हा नियोजन समिती सदस्य नवीन दादा घाटवळ, कर्जत तालुका प्रमुख उत्तम दादा कोळंबे खालापूर तालुका प्रमुख संतोष विचारे, उपजिल्हा आधिकरी प्रशांत खांडेकर तालुका युवा सेना अधिकारी अमर मिसाळ खालापूर तालुका युवा सेना अधिकारी महेश पाटील,खोपोली कर्जत मधील सर्व उपतालुका प्रमुख, नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close