ताज्या घडामोडी

खोपोली खालापूर भाजपाला खिंडार – मंगेश काळोखे याचा शिवसेनेत 500 कार्यकर्त्यांसह जाहिर प्रवेशङ

खोपोली खालापूर भाजपाला खिंडार – मंगेश काळोखे याचा शिवसेनेत 500 कार्यकर्त्यांसह जाहिर प्रवेश

खालापूर – समाधान दिसले

आगामी काळात खोपोली शहरासह खालापूर तालुक्यात काही ठिकाणी निवडणूका पार होणार असल्याने सर्व राजकीय पक्षाची सत्ता स्थापित करण्यासाठी मोठा रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून सर्व ठिकाणचे राजकीय पर्व चांगलेच तापू लागले आहे. त्यातच विविध पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रत्येक पक्षातील वरिष्ठांनी चांगलीच कंबर कसली असून खोपोली शहरातील तरुणांचे लाडके नेतृत्व तथा भाजपाचे नेते मंगेश काळोखे यांनी आपल्या 500 हून अधिक कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या कार्याप्रणालीवर प्रेरीत होत तसेच आमदार महेंद्र थोरवे या नेतृत्वावर विश्वास टाकत 18 जूलै रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर शिवसेनेत प्रवेश केल्याने खोपोली शहरातील शिवसेनेची ताकद अधिकच वाढणार असे मत राजकीय जाणकार व्यक्त करित आहेत.

खालापूर तालुक्यातील राजकीय पर्वाची चर्चा सर्वत्र सुरूच असून त्यामुळे साऱ्यांचे या तालुक्यातील निवडणूकांकडे लक्ष लागून राहत असते. तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉग्रेस, भाजपा, शेकाप, मनसे, आरपीआय, वंचित आघाडी यांच्यासह अन्य राजकीय पक्षात मोठी चुरस पाहायला मिळत असल्याने पदाधिकारी वर्गात एक प्रकारे रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षातील वरीष्ठ नेत्यासह कार्यकर्ते कंबर कसत असतात. त्यातच आगामी काळात खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात काही ठिकाणी सार्वत्रिक निवडणूका संपन्न होणार असून प्रतिष्ठित मानल्या जाणारी ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी राजकीय पुढारी वेगवेगळे फंडे अवलंबित असल्यामुळे असंख्य कार्यकर्तेही आकर्षित होऊ लागल्याने शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरीत होत तसेच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे या नेतृत्वावर विश्वास टाकत भाजपा नेते मंगेश काळोखे यांनी आपल्या 500 हून अधिक पदाधिकारी – कार्यकर्त्यांसह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत 18 जूलै रोजी मनसे प्रवेश केल्याने दिवसेंदिवस शिवसेनेची तालुक्यातील ताकद वाढू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत असून मंगेश काळोखेच्या शिवसेना प्रवेशाने खोपोली भाजपासह खालापूर तालुक्यातील भाजपाला मोठी खिंडार पडली आहे.

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, जेष्ठ सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, सल्लागार नवीन घाटवल, भरत भगत, दशरथ भगत, संघटक संतोष भोईर, महिला जिल्हा संघटीका रेखा ठाकरे, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोंळबे, खालापूर तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, खोपोली शहरप्रमुख सुनिल पाटील, खालापूर पंचायत समिती सदस्य उत्तम परबलकर, माजी उपसभापती कर्जत मनोहर थोरवे, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील अमर मिसाळ, शहर अधिकारी संतोष मालकर, जेष्ठ नेते सुदाम पवाळी, शिवराम दबे, तालुका महिला संघटीका रेश्मा आंग्रे, प्रिया जाधव, सुरेखा खेडकर, खोपोली नगराध्यक्षा विनिता औटी, नगरसेवक, संकेत भासे, दिलीप पुरी, जनार्दन थोरवे आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close