ताज्या घडामोडी

खड्ड्यात हरवला रस्ता …….. नेरळ-साईमंदिर रस्त्यावर खड्डेच खड्डे वाहनचालकांची तारेवरची कसरत कर्जत अपडेट करणार आंदोलन

खड्ड्यात हरवला रस्ता ……..
नेरळ-साईमंदिर रस्त्यावर खड्डेच खड्डे वाहनचालकांची तारेवरची कसरत
कर्जत अपडेट करणार आंदोलन

नेरळ : दिपक बोराडे

नेरळ-कळंब रस्त्यावरील साईमंदिर भागात रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण झाले नाही.त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहनचालक आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे वाहनचालक यांना अपघातास कारण ठरत असून खड्ड्यातून रस्ता शोधण्याची वेळ वाहनचालक यांच्यावर आली आहे.दरम्यान,कर्जत अपडेट हा सोशल मीडिया ग्रुप आंदोलन करणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली आहे.

नेरळ-कळंब राज्य मार्गावरील रस्त्यावर मागील वर्षी ठेकेदाराने काम सुरू केले होते. धामोते साई मंदिर ते पोही भागात काही ठिकाणी डांबरीकरणाचा भाग पूर्ण केला. पंरतू सिमेंट काँक्रीटचा 200 मीटरचा भाग ठेकेदाराने अर्धवट सोडला आहे.रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमलेल्या ठेकेदाराने दगड खडी यांचा एक थर देखील काँक्रीटकरण कामासाठी टाकली होती.उन्हाळ्यात तर वाहनचालक हे रस्त्यावरील मातीच्या धुळीने यांनी त्रस्त झाले होते.तर आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी त्रस्त झाले आहेत.त्याला जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना त्रास होत आहे.साई मंदिर या भागात रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहन चालक यांची कसरत सुरू आहे.पाऊस पडत असेल तर मात्र वाहनचालक रस्त्यावरील खड्डे चुकवायला जातात आणि त्यात अपघात होत आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असून साई मंदिर नाका खड्ड्यात हरवून गेला आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचा ठेका घेणार्‍या सिद्धिविनायक कॉन्ट्रक्शन या कंपनीला नोटीसा बजावल्या असल्या तरी ठेका घेणारे ठेकेदार हे सार्वजनिक बांधकाम विभागाला जुमानत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळयात वाहनचालकांना खड्ड्यातून जावे लागत असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या पर्यंत तक्रार गेल्या आहेत.पण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कधीही रस्त्यावर काम सुरू असताना तसेच काम बंद झाले तरी फिरकले नाहीत.विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियंत्रण नाही.त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी कर्जत अपडेट या सोशल मीडिया ग्रुपने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.10 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा अपडेट ग्रुपने दिला आहे.कर्जत अपडेट ग्रुपच्या वतीने विजय हजारे, मिलिंद विरले,पप्पू गांधी,प्रवीण मोरगे,गोरख शेप,संदीप म्हसकर,किशोर गायकवाड, शाहनवाज पानसरे, रामदास हजारे,यशवंत भवारे,अरविंद कटारिया,प्रवीण शिंगटे,गणेश पवार,दिलीप शेळके,यांनी निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहे.

 

 

 

 

अजयकुमार सर्वगोड-उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
तालुक्यातील काही रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत आणि ते भरण्यासाठी ठेकेदार नेमला जात आहे.प्राधान्याने नेरळ कळंब रस्त्यावरील खड्डे भरले जातील.

 

अरविंद कटारिया-सदस्य,कर्जत अपडेट
आम्ही एकदा आंदोलनाची हाक दिली की कितीही राजकीय प्रेशर आले तरी मागे वळून पाहत नाही.हे मागच्या रस्ता रोको आंदोलनाने प्रशासनाने पाहिले आहे.त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर मात्र आंदोलन नक्की आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close