ताज्या घडामोडी

येवला,बोकटे येथिल जयश्री साठे या विद्यार्थ्यांनीचे कृषी औद्योगिक कार्यानुभव,आणि ग्रामीण कृषी जागृकता अभियान संपन्न.

येवला,बोकटे येथि जयश्री साठे या विद्यार्थ्यांनीचे कृषी औद्योगिक कार्यानुभव,आणि ग्रामीण कृषी जागृकता अभियान संपन्न.

अंदरसुल प्रतिनिधी
हितेश दाभाडे

येवला तालुक्यातील जयश्री सुनिल साठे हिने श्रमशक्ती कृषी महाविद्यालय,मालदाड येथे शिक्षण घेत असतांना कृषी औद्योगिक कार्यानुभव,आणि ग्रामीण कृषी जागरुकता अभियानाचा एक भाग म्हणून

बोकटे येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक भाऊराव मोरे,तलाठी अश्विनी शेंडे,पोलीस पाटील सुरेश दाभाडे,कृषी सहाय्यक गीरी ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्याकडून गावाची संपुर्ण आवश्यक माहिती जमा केली.यानंतर गावातील प्रगतशील शेतकरी देविदास दाभाडे यांच्या शेतात जाऊन तीने पिकांचा आढावा घेतला.तेंव्हा तीने अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना माती परीक्षण,बीज प्रक्रिया,स्वच्छ दूध उत्पादन,प्रक्रिया युक्त पदार्थांची निर्मिती करणे,कीड नियंत्रण शेतकऱ्यांनी पिकांची फवारणी करतांनाची घ्यावयाची काळजी,आदिं विषयी जयश्रीने शेतकऱ्यांना विविध योजनांची घरो-घरी जावून माहिती दिली यासाठी शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दर्शविला.

कृषी कन्येच्या या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी तिला संस्थेचे अध्यक्ष साहेबराव नवले ,डॉ.अशोक कडलग,डॉ.अरविंद हारदे, प्रा. निलेश तायडे ,कार्यक्रम अधिकारी डॉ. नेहा काळे व इतर सर्व विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close