ताज्या घडामोडी

*वीज वितरण कार्यालयावर श्रमजीवीची धडक आणि नरेश गोवारीला न्याय*

*सुहास पांचाळ / पालघर*

गणेशपुरी : दि.१७ :
वीज वितरण विभागाच्या गणेशपुरी कार्यालयावर निघालेल्या श्रमजीवी संघटनेच्या धडक मोर्चाला यश मिळाले. अपघातात जखमी झालेला वीज कर्मचारी नरेश गोवारी या गरिबाला श्रमजीवीच्या आंदोलनाने न्याय मिळाला. उपचाराचा संपूर्ण खर्च, तातडीची भरपाई, उपचार काळात वेतन,संबंधितांवर कायदेशीर कारवाई आणि नरेश याच्या पत्नीला कामावर घेण्याची मागणी यावेळी वीज वितरण अधिकाऱ्यांनी मान्य केल्याने नरेश च्या न्याय्य हक्कासाठी उभारलेल्या श्रमजीवीच्या लढ्याला यश आले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी स्वतः या प्रश्नावर लक्ष घातल्याने या लढ्याला तात्काळ यश मिळाले आहे.

वीज वितरण विभागाच्या गणेशपुरी विभागात नरेश सिताराम गोवारी हा आदिवासी वीज कर्मचारी कार्यरत आहे.  दिनांक 21 मे रोजीच्या वादळी पावसामुळे वीज वितरण व्यवस्था विभागाची संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली असताना नरेश गोवारी या होतकरू कर्मचाऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून विज प्रवाह सुरळीत करण्यासाठी आपल्या आपल्या वरिष्ठांच्या सूचना आदेशाप्रमाणे काम केले. या दरम्यान एका इसमाने अचानक वीज कनेक्शन सुरू केल्याने नरेशला विजेचा धक्का लागला आणि तो विजेच्या खांबावरून कोसळला व गंभीर जखमी झाला. त्या काळामध्ये जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं क्रमप्राप्त होतं, आवश्यक होतं ते गणेशपुरी विभागाच्या शाखा अभियंता आणि इतर अधिकाऱ्यांनी केलं नाही. नरेशला खाजगी दवाखान्यात ऍडमिट करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. आपल्या वरिष्ठ कार्यालयात कळवताना हेराफेरी करणारा रिपोर्ट बनवून वरिष्ठांची दिशाभूल केली. हे प्रकरण संघटनेकडे येतात रीतसर पत्रव्यवहार करून शिष्टमंडळाने पदाधिकारी कार्यकर्ते चर्चेला आले असता आपल्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा न करता उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे श्रमजीवीने मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाची दखल घेत वीज वितरण विभागाचे अधिकारी प्रशांत सोनार, संजय तिडके, इरफान शेख यांनी स्वतः गणेशपुरी येथे
येऊन मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी श्रमजीवी संघटनेचे खजिनदार फ्रान्सिस लेमोस, प्रवक्ते, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार,तालुका अध्यक्ष सुनील लोने, उपाध्यक्ष नारायण जोशी, दुष्यंत घायवट, मोहन शिंदे, कोंडू सांबरे, लक्ष्मी मुकणे , वैशाली पाटील, भगवान देसले, काशीनाथ चिपळूणकर, नवनाथ भोये, सुरज दळवी, आदेश वाघ, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close