ताज्या घडामोडी

खाकी वर्दीतील देव माणूस – खालापूर पोलिसांच्या मदतीने कोरोनामध्ये मयत झालेल्या पोलिस पाटलांच्या कुटुंबाला 1 लाखाची मदत

खाकी वर्दीतील देव माणूस – खालापूर पोलिसांच्या मदतीने कोरोनामध्ये मयत झालेल्या पोलिस पाटलांच्या कुटुंबाला 1 लाखाची मदत

खालापूर – समाधान दिसले

खालापूर तालुका पोलिस पाटील संघाची सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 17 जूलै रोजी सकाळी 11 वाजता खालापूर पोलिस ठाण्यात खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून यावेळी कोरोनामुळे शहीद झालेल्या पाटलांच्या कुटुंबियाना सांत्वनपर अर्थिक मदत करित श्रध्दाजंली वाहिण्यात आल्याने ढेकू येथील सम्राट सुर्वे यांच्या कुटुंबाला 1 लाखाचा चेक दिल्याने खालापूर पोलिस व सर्व पोलिस पाटलांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

पोलिस म्हटलं की, अनेकांना भीती निर्माण होत असते. परंतु पोलिसांच्या खाकी वर्दीतही देव माणूस दडला असल्याचा अनेक पाहायला मिळत आहे. खालापूर पोलिसांनी कोरोना काळात केलेली उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व खालापूरकरांनी कौतुक केले असल्याने खाकी वर्दीतील देव माणूस म्हणून त्याच्या कार्याची प्रचिती खालापूरकरांनी पाहिली असताना याकाळात खालापूर पोलिसांनी पाच गावे दत्तक घेऊन आदर्श निर्माण करीत विधवा महिला मदत, विधवा महिलेला घरावर छप्पर देणे असे अनेक कार्य केल्याने खालापूर पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय असताना 17 जूलै रोजी खालापूर पोलिस ठाणे प्रशासन व पोलिस पाटील संघ यांच्या सहकार्यातून कोरोनाने मयत झालेल्या ढेकू येथील पोलिस पाटील सम्राट सुर्वे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून 1 लाखाचा धनादेश देत सांत्वन केल्याने खालापूर पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

तर यावेळी कोरोना व इतर कारणामुळे शहीद झालेल्या पोलीस पाटीलांना श्रध्दांजली वाहून कोरोनामुळे शहीद झालेल्या पोलिस पाटलांच्या कुटुंबियाना सांत्वनपर अर्थिक मदत करण्यात आली, पोलिस पाटीलांसाठी विमा योजनेचे माहीती तर पोलीस पाटीलांचे नुतनीकरण व समस्यांवर मनोगत, तालुका कार्यकारणी जाहीर करणे असा समारंभ पार पडल्याने पोलिस पाटलांमध्ये उत्साह संचारला होता.

याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलिस निरिक्षक अनिल विभूते, पोलिस पाटील संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव कमलाकर मांगळे, रायगड जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र दुदसकर, जिल्हा सचिव विकास पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष मिलिंद पोपटे, उपाध्यक्ष संतोष गायकर, खालापूर तालुका अध्यक्ष अनंत ठोंबरे, माजी अध्यक्ष राजू केदारी, सचिव पंकज देशमुख आदीप्रमुखासह रसायनी – खालापूर व खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील बंधू-भगिनींनी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close