ताज्या घडामोडी

पाटोदा येथे प्रांत साहेबांच्या आदेशाचे काटेकोर पणे पालन

*पाटोदा येथे प्रांत साहेबांच्या आदेशाचे काटेकोर पणे पालन

प्रतिनिधी/एजाज देशमुख

ग्रामीण भागात covid-19 च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून जी नियमावली दिली त्यात सर्व आस्थापने अत्यावश्यक सेवा सोडून सकाळी सहा ते चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात यावी व संध्याकाळी चार ते दहा या वेळेत हॉटेल व्यवसायिकांनी पार्सल सेवा चालू ठेवावी, असे असले तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत ग्रामीण भागात सर्रासपणे सर्व व्यवसाय अनियमितपणे होत होते तसेच आठवड्याचा बाजार देखील बिनधास्तपणे सर्वत्र भरत होते, मात्र येवल्याचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी साहेब श्री सोपान कासार यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी गट विकास अधिकारी यांना तातडीने नोटीस बजावत ही बाब निदर्शनास आणून दिली व तात्काळ हा सर्व प्रकार थांबवण्याचे नोटिशी द्वारे आदेश काढले.
आणि झोपलेली यंत्रणा जागी झाली गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतींना यासंदर्भात बैठक घेऊन या विषयावर काटेकोरपणाने आदेशाचे पालन करा असे , आदेश देताच पाटोदा येथील सर्व स्थापने दुपारी चार वाजता बंद करण्यात आली यासाठी पाटोदा येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील मुजम्मिल चौधरी सह पाटोदा चे तरुण तडफदार सरपंच प्रताप पाचपुते व त्यांचे सहकारी यांनी पुर्ण गावात फेरफटका मारत आस्थापने बंद करण्याबाबत सूचना दिल्या तसेच संभाव्य धोक्याबाबत चर्चादेखील केली यासाठी गावातील व्यवसायिकांनी सहकार्य करत आपापली दुकाने चार वाजता काटेकोरपणाने बंद केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close