ताज्या घडामोडी

मुकेश गहलाचा मृत्यु नव्हे असंवेदनशील व्यवस्थेने केलेली हत्या आहे*

*मुकेश गहलाचा मृत्यु नव्हे असंवेदनशील व्यवस्थेने केलेली हत्या आहे*

सुहास पांचाळ/ पालघर

वाडा : दि. 15 जुलै : काल वाडा तालुक्यातील नांदनी या गावातील एक विडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. मुकेश गहला या तरुणाला सर्पदंश झालेला, त्याला नादुरुस्त रस्त्यामुले वेळेत दवाखान्यात पोहचता आले नाही, म्हणून त्याचा दुर्दैवी अंत

झाला. हा विडिओ पाहिल्यानंतर आज श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार भाऊ यांनी नांदनी येथे जाऊन सर्प दशांने मृत्युमुखी पडलेल्या मुकेश गहला याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी विडिओ बनवून हे भयाण वास्तव उजेडात आणणाऱ्या प्रवीण भोवरे या धाडसी तरुणाची भेट घेतली आणि त्याचे कौतुक केले.

यावेळी प्रमोद पवार येथील नादुरुस्त रस्त्याची पाहणी केली. आरोग्य व्यवस्थेची माहिती घेतली. येथील अनेक तरुण यावेळी प्रमोद भाऊंना भेटायला जमलेले होते.येथील 25-30 आदिवासी दुर्गम पाड्यांचे आरोग्य केवळ एक डॉक्टर आणि एक नर्स असलेल्या या निंबवली आरोग्य पथकावर अवलंबलेले आहे.

येथील रस्ता अत्यंत नादुरुस्त असून याठिकाणी प्रशासन आहे की नाही प्रश्न पडतो. लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. मुकेश चा मृत्यु हा सर्प दंशाने नव्हे तर या असंवेदनशील व्यवस्थेने घेतलेला बळी आहे, व्यवस्थेने केलेली हत्या आहे, दुर्दैवाने हे गाव भिवंडी ग्रामीण विधानसभा आणि भिवंडी लोकसभा क्षेत्रात येत आहे. मुंबईपासून अवघ्या

70 किलोमीटर असलेल्या या नांदनी- अंबरभुई गावात असे भयाण मृत्यू आदिवासींच्या गरिबांच्या नशिबी येत असतील तर स्वातंत्र्य इथवर पोहोचलेच नाही असे श्रमजीवी संघटनेचे श्री.प्रमोद पवार यांचे म्हणणे आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close