ताज्या घडामोडी

संतापजनक:- लिंग पिसाळ वनरक्षकाकडून १३ वर्षीय आदिवासी बालिकेचा विनयभंग*

*संतापजनक:- लिंग पिसाळ वनरक्षकाकडून १३ वर्षीय आदिवासी बालिकेचा विनयभंग*

*ठळक मुद्दे*

*मुलींचे आई-वडील बाहेर गावी गेले होते.

*मुली घरात एकटी असल्याची माहिती वनरक्षकाला अधिच असावी

*पाणी पिण्याच्या बहाण्याने वनरक्षक शिरला त्यामुलींच्या घरात

*नराधाम वनरक्षक विरुद्ध तब्बल ८ तासानंतर गुन्हा दाखल
—————————————-

सावदा प्रतिनिधी फरीद शेख  

जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या सातपुडा डोंगराच्या कुशीत वसलेल्या आदिवासी वस्ती असलेल्या लगडा आंबा पाड्यावरील पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरून १३ वर्षीय आदिवासी मुलींचा येथील वन्य जीवन रक्षण विभागाचे एका वनरक्षकाने दि.१३ जुलै सकाळी १० वाजेच्या सुमारास विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडलेली आहे .

सविस्तर वृत्त असे की, सदरील १३ वर्षीय आदिवासी मुलींसह २ लहान बालकांना त्यांचे आई-वडील घरी सोडून बाहेरगावी गेले होते याची माहिती येथील *वनरक्षक रमेश बबूता थोरात* याला असावी म्हणून त्यांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने वाईट हेतू ठेवून या आदिवासी मुलींच्या घरात शिरून पिण्यासाठी पाणी मागितले असता घरात असलेली ६ वर्षीय बालिकेने त्याला पाणी आणून दिले ते पाणी न पिता सदरील बालिकेस वीस रुपये देऊन हपसी वरून ताजे पाणी आणण्याचे सांगितले नंतर दुसऱ्या बालकास पैसे देऊन बिस्किटे आणण्या करिता पाठवून थेट १३ वर्षीय आदिवासी बालिका घरात एकटी असल्याची संधीचा गैरफायदा उचलून थेट लिंग पिसाळ वनरक्षकाने बालीकेशी अंगलट करीत त्याच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य करून विनयभंग केला असल्याची तक्रार पीडित बालिकेच्या आईने दिल्यावरून येथील पोलीस स्टेशनात लैंगिक गुन्हयापासून बालकांचे रक्षण कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार विनोद खांडबाहाले व सहकारी पुढील तपास करीत आहे.

*तब्बल ८ तासानंतर यावल पोलिसांनी केली गुन्ह्याची नोंद !*

सातपुडा डोंगराच्या कुशीत बसलेल्या अतिदुर्गम भागातील लंगडा आंबा येथील बुधवारी दुपारी साडेतीन वाजता पोलीस ठाण्यात आलेल्या या आदिवासी पीडित कुटुंबाची फिर्याद मध्यरात्री जवळपास ८ तास उलटल्यानंतर नोंद करण्यात आली!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close