ताज्या घडामोडी

संपादकीय, पोलीस टाईम्स न्युज ⭕दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

संपादकीय, पोलीस टाईम्स न्युज ⭕दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

शातांरामभाऊ दुनबळे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं.

दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो.
मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे.
मात्र उद्या १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे अशी अधिकृत माहिती राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल उद्या १ वाजता जाहीर होणार आहे.
निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, mahahsscboard.in
वर उपलब्ध होणार आहे.
२९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत दहावीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान शासनाने १२ मे रोजी ही परीक्षा रद्द करत असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर २८ मे रोजी
१० वीसाटठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती.
त्यानुसार १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आलं.
त्यामध्ये ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ४८ हजार ६९३ मुली आहेत.
त्यानंतर आता शुक्रवारी हा निकाल १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
इथे पाहा निकाल mahresult.nic.in sscresult.mkcl.org maharashtraeducation.com

⭕कसा पाहाल निकाल?

दहावीचा निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या संकेतस्थळावर जा.
– त्यानंतर Maharashtra SSC Result 2021 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2021 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल. –
तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close