ताज्या घडामोडी

फैजपूर – मधुकर साखर कारखाना जवळ गावठी रिव्हॉल्वर, ३ जीवंत काडतूसांसह चाकू हस्तगत : आमोदा येथील दोघांना अटक

*फैजपूर – मधुकर साखर कारखाना जवळ गावठी रिव्हॉल्वर, ३ जीवंत काडतूसांसह चाकू हस्तगत : आमोदा येथील दोघांना अटक*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या
फैजपूर पासून २ कि.मी अंतरावर असलेले मधुकर साखर कारखाना जवळ यावल रोडवरील हॉटेल तृभावी समोर वाद घालणाऱ्या दोन तरुणां जवळून पोलिसांनी गावठी रिव्हॉल्वर,३ जीवंत काडतूसांसह धारदार चाकू हस्तगत केल्याची घटना घडली.यामुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील फैजपूर- यावल रोडवरील मधुकर साखर कारखाना जवळ हॉटेल तृभावी समोर आमोदा येथील दोन तरुणांमध्ये मोठा वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना कळताच ताबडतोड पो.हे.कॉ.राजेश ब-हाटे व होमगार्ड श्रीकांत इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता दोन तरुणांमध्ये हातापाई होत असल्याचे त्यांना दिसून आले. दरम्यान लगेच घटनास्थळी फैजपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पो.हे.कॉ.राजेश ब-हाटे यांनी पंचांसमक्ष कारवाई करुन एक गावठी रिव्हॉल्वर,३ जिवंत काडतुसे व धारदार चाकू सदरील वादघालणाऱ्यां पासून जागीच हस्तगत केले आणि दोघा तरुणांना ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी की संध्याकाळी यावल रोडवरील म्हैसपुर मधुकर साखर कारखान्याजवळ हॉटेल तृभावी समोर दोन तरुणांमध्ये वाद सुरू असतांना अचानक वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले व एकाने दुसऱ्या वर पिस्तूल (गावठी कट्टा) उगारला. या प्रकाराची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांनी पोलीस उपनिरिक्षक रोहिदास ठोंबरे व न्हावी बीटचे पो.हे.कॉ.राजेश ब-हाटे, होमगार्ड श्रीकांत इंगळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली . तेव्हा या ठिकाणी एकमेकांसोबत हाणामारी करतांना संशयीत तरुण विशाल गणेश सपकाळे,वय २९ व दूसरा तरुण दिपक शांताराम सपकाळे,वय २६ दोन्ही रा.आमोदा ता. यावल यांना दोघा
एका गावठी रिव्हॉल्वर, ३ जिवंत काडतुसे व एक धारदार चाकू पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एकूण २३, ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले

आमोदा सारखे ग्रामीण गावखेड्यात राहणारे तरुणा जवळ गावठी रिव्हॉल्वर आणि काडतूसे सह धारदार चाकू असे घातक शस्त्र असणे किंवा अशा शास्त्रांना सोबत घेऊन खुलेआम वाद घालने त्यांनाच महाग पडले परंतु या घटनेमुळे येथील परिसरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हे मात्र खरे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close