ताज्या घडामोडी

वाणीचिंचाळे येथे सहयाद्री देवराई च्या वतीने साकारणार जैवविविधता उद्यान*,

*वाणीचिंचाळे येथे सहयाद्री देवराई च्या वतीने साकारणार जैवविविधता उद्यान*

सामाजिक वनविभाग ,ग्रामपंचायत वाणीचिंचाळे,ग्रामस्थ व विविध संस्थेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील पहिला उपक्रम●
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

सांगोला/विकास गंगणे-

सांगोला तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वाणीचिंचाळे गावाने यापूर्वी वाढदिवसाच्या निमित्ताने झाड लावणे, महापुरुषांच्या जंयतीच्या निमित्ताने झाड लावणे.तसेच विविध प्रसंगी झाड लावून ती जगविली आहेत. यासाठी गावातील सर्व लोक पुढाकार घेतात.तसेच गावात असलेल्या वनक्षेत्रात वनविभागाच्या व सामाजिक वनविभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन ती जगविली आहेत. यामुळेच गावातील सर्व पदाधिकारी यांनी एकत्र येऊन गाव हरीत करण्यासाठी एक चळवळ उभा करण्याचे ठरवले. यानुसारच सिनेअभिनेते सयाजी शिंदे ,व अरविंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक वनविभाग ,सहयाद्री देवराई व ग्रामपंचायत वाणीचिंचाळे, ग्रामस्थ तसेच तालुक्यातील विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने गावातील 7.99हे क्षेत्रावर 8500खड्डे पाडून या क्षेत्रावर फक्त देशी झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आँक्सीजन देणाऱ्या झाडाची लागवड करण्यात येणार आहे.तसेच तालुक्यातील तसेच अनेक दानशुर व्यक्तीनी या जैवविविधता उद्यान तयार करण्यासाठी देशी रोपे देऊन सहकार्य केले आहे. तसेच वृक्ष संवर्धन व संगोपन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वाणीचिंचाळे गावात यापूर्वी पाणी फाऊंडेशन, तसेच विविध उपक्रमात यशस्वी सहभाग घेऊन गावात चांगल्या काम सर्वांच्या सहकार्याने करत आहेत.यामुळेच गावात हरीत वाणीचिंचाळे हि संकल्पना यशस्वी करण्यासाठी गाव आता एकवटले आहे.
कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेकजण आँक्सीजनच्या तुटवडयामुळे मृत्युमुखी पडले .यामुळेच भविष्यात हे संकट आपल्या भावी पिढीवर ओढावु नये म्हणून हे एक माँडेल म्हणून उभारण्यात येणार आहे.
यावेळी वाणीचिंचाळे सहयाद्री देवराई टिमच्या वतीने आवाहन करण्यात आले कि सदर जैवविविधता उद्यानाच्यासाठी आपण मदत करावी.
एक_झाड किंवा इतर साहित्य अशी मदत देऊन सह्याद्री देवराई वाणीचिंचाळे जैवविविधता उद्यान प्रकल्प साकारण्यास आपले योगदान द्यावे. आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचे काहीतर देणे लागतो या भावनेने सर्वांनी पुढे यावे असे आव्हान सहयाद्री देवराई वाणीचिंचाळे करत आहे. सध्या कोरोनाच्या काळात अनेकांना आँक्सीजनच्या कमतरतेमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. भविष्यात आपल्या भावी पिढीला आँक्सीजनची कमतरता पडू नये म्हणून लोकसहभागातून हे जैवविविधता उद्यान तयार करण्यासाठी आपली मदत हि महत्त्वाची आहे.आपण हि मदत फक्त झाड किंवा साहित्य यामाध्यमातुनच दयावी…यामध्ये मोठी देशी झाडे देऊन अनमोल असे सहकार्य करावे.(वड,पिंपळ,उंबर, पिपरन,चिंच,जांभूळ, कडुनिंब, काटेसावर, बहावा, तामण,पळस, बकुळ, चाफा,कांचनार, आपटा,पारीजातक,आवळा, कवट,बेहडा, बेल,शिरीष,)..इ प्रकारची देशी झाडे देऊन मदत करावी असे सांगितले
तसेच या उपक्रमाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधवा.

संपर्क-8830013125,
9763039783
8888446763
9850517390
7972281323

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close