ताज्या घडामोडी

केंद्र सरकारकडून विज महावितरण कंपनीस आर्थिक मदत करा- रि पा ई चे उतर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिलभाई गांगुर्डे यांची मागणी .

केंद्र सरकारकडून विज महावितरण कंपनीस आर्थिक मदत करा- रि पा ई चे उतर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिलभाई गांगुर्डे यांची मागणी .

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक-:आज नुकतीच दिनांक 14/7/2021 बुधवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले साहेब यांची रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन वरील निवेदन दिले…

निवेदनाचा आशय असा आहे की कोरोना काळात शेतकरी व दारिद्र रेषेखालील नागरिकांचे विज महावितरण कंपनीचे बिल थकल्याने महावितरणचे कर्मचारी कोणातीही पूर्वसूचना न देता विज कनेक्शन कट करत आहे जर सामाजिक कार्यकर्ते यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला तर महावितरण कंपनी तोट्यात असून राज्य सरकारकडे विज बिल माफ इतपत निधी नाही त्या अनुषंगाने आज रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अनिलभाई गांगुर्डे यांनी नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या कानावर हा प्रकार घातला असता मंत्री साहेबांनी महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्र पाठवले तसेच केंद्राकडून महावितरण कंपनीस मदत करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.सतिष केदारी, प्रदेश उपाध्यक्ष मा. करण शिंदे,उत्तर महाराष्ट्र नेते सुजितकुमार आहिरे,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close