ताज्या घडामोडी

सावधान :- हतनूर धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले*

*सावधान :- हतनूर धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले*

*तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :-जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेले व सावदा शहरापासून जवळपास 1३ कि.मी अंतरावर असलेले – हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात दि.१२ जुलै रोजी पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे एकूण १६ दरवाजे पूर्ण पणे उघडण्यात आले आहेत.तसेच आज दि. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात ४५८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.

पुढील २४ तासात पाणीचा प्रवाह अजून वाढण्याची दाट शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये जाऊ नये तसेच कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये असे आवाहन कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे. तरी तापी नदी काठाच्या नागरिकांनी याची गंभीर दखल घेऊन सावधानता बाळगावी हे मात्र गरजेचे आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close