ताज्या घडामोडी

सामाजिक बांधीलकी जपत जि. प.शाळेत केले शैक्षणिक साहित्य वाटप

सामाजिक बांधीलकी जपत जि. प.शाळेत केले शैक्षणिक साहित्य वाटप

 

           नेरळ : दिपक बोराडे                

कर्जत तालुक्यातील कळंब येथील बोंडशेत,पेंढरी जिल्हा परिषद शाळेत सामाजिक बांधिलकी जपत साजना भुजबळ यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
लॉक डाऊन काळात शाळा बंद आहेत मात्र शिक्षण सुरू या शासनाच्या धोरणानुसार ऑनलाईन शिकविण्यास सुरुवात झाले आहे. त्यात अतिदुर्गम भागातील बोंडशेत,पेंढरी या गावातील जिल्हा परिषद शाळांमधील 1 ली ते 5 वि या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप साजना भुजबळ यांनी केले.विशेष करून पुण्यावरून कर्जतच्या शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधले आणि त्यांच्या आठवणीमधील काही गमतीजमती किस्से सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या साजना भुजबळ, निर्धार संघटनेचे अध्यक्ष सतीश जाधव,काँग्रेस उपाध्यक्ष हेमंत देशमुख, दिलीप भुजबळ, आरटीआय अध्यक्ष अमोघ कुळकर्णी, नारीशक्ती संघटनेच्या ज्योती जाधव, स्वीटी बार्शी, सुप्रिया मोरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे आदी उपस्थित होते.
विशेष करून 1ली ते पाचवी च्या सर्व विद्यार्थ्यांनी तोंडाला मास्क लावून उपस्थिती दर्शविली होती. हे कौतुकास्पद असल्याचे हेमंत देशमुख यांनी केले. आदीवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला होता. यावेळी पेंढरी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लोखंडे , मुख्याध्यापक रेवा कुंवर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष ,प्रकाश थोराड शेवंता होले, सावित्री पारधी ,बच्चीबाई थोरात ,विद्यार्थी उपस्थिती दर्शविली होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close