ताज्या घडामोडी

*जिव्हाळा फौंडेशन, बुधगांव यांच्या वतीने सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच साजरा करण्यात आला झाडांचा वाढदिवस

*प्रतिनिधी सुरज शेख माधवनगर* *सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी*

*जिव्हाळा फौंडेशन, बुधगांव यांच्या वतीने सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच साजरा करण्यात आला झाडांचा वाढदिवस

गेल्या दोनवर्षांपासून आपल्या जिव्हाळा फौंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धन कार्य सुरू आहे. त्यानिमित्ताने आज झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे खतापासून तयार करण्यात आलेला केक कापून झाडांना अर्पण करण्यात आला.
त्याचबरोबर, काही दिवसांपूर्वी आपल्या फौंडेशनचे जुने सदस्य प्रसिद्ध मूर्तिकार योगीराज कुंभार यांचे निधन झाले. त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ एक झाड लावण्यात आले.
आजच्या या कार्यक्रमासाठी *⚔️मिरज संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत माधवराव पटवर्धन सरकार⚔️* उपस्थित होते. त्याचबरोबर, महाराजांनी जिव्हाळा फौंडेशनच्या सर्व सदस्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच मिरज संस्थानचे ऍडव्होकेट श्रीकृष्ण पोतकुळे सर देखील उपस्थित होते.

k

आजच्या या कार्यक्रमात गोविंदराव काका परांजपे, महादेव कवठेकर, एसटीचे निवृत्त अधिकारी दीपक कांबळे सर, पोलीस हवालदार गुणाजी गोसावी काका, आरटीओ ऑफिसर सुनील मुळे सर, मनोजकुमार मुळीक सर, विवेकानंद लुगडे, मेजर नारायण जाधव, डॉ. सुकृत फडके, अशोक धस्के, विनायक उर्फ बंडू पटवर्धन, श्रीकांत करांडे, महादेव चव्हाण, सागर कस्तुरे, सौरभ गोकावे, अनिकेत पवार, संकेत लठ्ठे,अथर्व कवठेकर, सिद्धार्थ गोकावे, राजवर्धन मुळीक, निनाद टेके, आदित्य कवठेकर, पियुष जाधव व सर्व जिव्हाळा फौंडेशन टीम आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होती

*प्रतिनिधी सुरज शेख माधवनगर*
*सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close