ताज्या घडामोडी

हलीवली ग्रामपंचायत हद्दीतील गटार व हलीवली आदिवासीवाडी येथील स्मशानभूमीचे भूमिपूजन रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य क्रीडा सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते संपन्न

हलीवली ग्रामपंचायत हद्दीतील गटार व हलीवली आदिवासीवाडी येथील स्मशानभूमीचे भूमिपूजन रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य क्रीडा सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते संपन्न

कर्जत तालुक्यात वाहू लागले विकास        कामांचे वारे    

कर्जत : विजय डेरवणकर

माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती सुधाकर भाऊ घारे यांनी विकास कामांना गती देऊन कर्जत तालुक्यांतून लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळे सुधाकर भाऊ घारे यांच्या संपन्न होत आहेत


कर्जत तालुक्यातील हलीवली ग्रामपंचायत हद्दीतील सुयोग सोसायटी येथील बंदीस्त गटारांसाठी पाच लाख रुपये निधी तर हलीवली आदिवासी वाडी येथील स्मशानभूमी साठी पाच लाख रुपये असे मिळून दहा लाख निधी जिल्हा परिषद शेस फंडातून उपलब्ध करून रविवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते हलीवली येथील बंदीस्त गटारे व हलीवली आदिवासी वाडी येथील स्मशानभूमीचे भूमिपूजन संपन्न झाले या प्रसंगी विठ्ठल रखुमाई मंदिरा मध्ये ग्रामस्थांनी सुधाकर भाऊ घारे यांचे शाल श्रीफळ देऊन आभार मानले याप्रसंगी बळीराम देशमुख मालू निरगुडा संतोष थोरवे किशोर सावंत समीर लोंगले सावळाराम हांडे भानुदास बोराडे प्रशांत दिनकर मयूर खडे रमेश दिनकर विजय शिंदे राजू बोराडे रुपेश म्हसकर प्रकाश जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close