ताज्या घडामोडी

नगरपरिषद व चांदवड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी डेल्टा व झिंका विषाणूला दुर्लक्षित करू नका*

Ξ

*नगरपरिषद व चांदवड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी डेल्टा व झिंका विषाणूला दुर्लक्षित करू नका*
चांदवड तालुका प्रतिनिधी:सुनिलआण्णा सोनवणे

पहिला कोरोना काळ व दुसरा कोरोना काळ कशा पद्धतीने गेला हे सर्वजण जाणून आहेत हा कोरोना कालावधी सतत या ना त्या कारणाने वाढतच आहे सध्या नवीन नवीन प्रकारचे कोरोना विषाणू निर्मिती होत आहे व त्यामुळे प्रसारही चांगल्याप्रकारे होत आहे
चांदवड नगर परिषद व तालुक्यातील ग्रामपंचायती अजूनहि सुस्त स्वरूपात आहेत तालुक्यात कुठेही फवारणी चालू नसल्याने मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती झाली आहे
आता जो झिंका हा नवीन कोरोनाा चा विषाणू केरळमध्ये आला आहे तोसुद्धा डास मच्छर यामुळे या विषाणूचा संक्रमण होत आहे त्यात ताप, त्वचेवर लाल रंगाचे डाग, डोके दुखी, सांधेदुखी, डोळे लाल होणे ही लक्षणे दिसत आहेत
चांदवड नगरपरिषद हद्दीत व संपूर्ण तालुक्यातच डासांचा फारच उपग्रह वाढला असल्याने चांदवड नगर परिषद प्रशासनाने व तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी आत्ताच जागे होऊन आपल्या शहराला व खेड्यांना तसेच चांदवड तालुक्याला कसे सुरक्षित ठेवता येईल त्याकरता प्रत्येक गावात फवारणीचे नियोजन करून संपूर्ण चांदवड तालुक्याला अधिकारी वर्गाने पुढाकार घेऊन तालुका सुरक्षितेची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close