ताज्या घडामोडी

भिलवडी येथील अंकलखोप गावामध्ये कोरोनाचा हाहाकार*

*हेडर-भिलवडी येथील अंकलखोप गावामध्ये कोरोनाचा हाहाकार*

फुटर-भिलवडी येथील अंकलखोप येथे गेले पंधरा ते वीस दिवस झाले कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.तरी येथील नागरिक जरा ही महामारीचा विचार न करता व काळजी न घेता विनामास्क फिरताना दिसत आहेत.तरी याला कुठे तरी आळा बसावा म्हणून अंकलखोप आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व ग्रामपंचायत अंकलखोपचे ग्रामसेवक,सरपंच यांनी आज अखेरची कोरोना पोसिटीव्ह रुग्णसंख्या 357 आहे,तर त्यातील 57 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत,म्हणून यांनी विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची व घरोघरी जाऊन प्रत्येकाची अँटिजेंन टेस्ट केली जात आहे.तरी आज दि 09-07-2021 रोजी अंकलखोप येथील म्हसोबा देवस्थान जे प्रसिद्ध आहे त्यामुळे तेथे येणाऱ्या बाहेर गावच्या नागरिकांची ही अँटिजेंन टेस्ट करून दर्शनासाठी सोडले जात होते.यावेळी तेथे 80 ते 90 लोकांची अँटिजेंन टेस्ट करण्यात आली.यावेळी समुदाय अधिकारी, आरोग्य अधिकारी,डॉ अमित कुमार जयसिंग सूर्यवंशी तसेच (परिचारिका)सौ अनुराधा जावीर व आरोग्य सहाय्यक एन पी सावंत,उपस्थित होते.तरी आमच्या पोलीस टाईम्स न्युज 24 कडून अंकलखोप गावातील नागरिकांना विनंती आहे विनामास्क फिरणे टाळा,व आपली कोरोना टेस्ट करून आपल्या गावाला सहकार्य करा,आपल्या व आपल्या घरातील सर्व कुटुंबाची काळजी घ्या.वि विनंती.

*प्रतिनिधी तानाजी सादरे कवलापूर*
*सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close