ताज्या घडामोडी

केंद्रीय कँबिनेट मंत्रीपदाची डॉ.भारतीताई प्रवीण पवार यांनी शपथ घेताच तालुक्यात व जिल्ह्यात एकच जल्लोष*

*केंद्रीय कँबिनेट मंत्रीपदाची डॉ.भारतीताई प्रवीण पवार यांनी शपथ घेताच तालुक्यात व जिल्ह्यात एकच जल्लोष*
चांदवड :सुनिलआण्णा सोनवणे

नाशिक जिल्ह्याला आजपर्यंत कधीही न मिळालेले *केंद्रीय मंत्री पद सौ. भारतीताई* *पवार* यांच्या रूपाने मिळाले तेव्हा संपूर्ण चांदवड तालुक्यात तसेच नाशिक जिल्ह्यात एकच जल्लोष झाला संपूर्ण नाशिक जिल्हा आनंदाने न्हाऊन निघाला ज्यावेळेस आपल्या खासदार भारतीताई पवार यांनी……
*‘मै डॉ.भारतीताई प्रवीण पवार,… ईश्वर की शपथ लेती हूँ की…’*
असं म्हणत भाजप दिंडोरी खासदार यांनी केंद्रीय कँबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि नाशिक सह चांदवड मध्ये एकच जल्लोष करण्यात आला.कांदा, द्राक्ष,शेतकरी माणसासाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ.भारतीताई पवार नेत्यांची देशाच्या राजकारणात झालेली निवड ही सर्वार्थाने दिंडोरी लोकसभा माणसाची मान उंचवणारी आहे अशा भावना व्यक्त करत अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत आणि फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.
चांदवड येथील गणुर चौफुली येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी *”ताई साहेब* *आगे बढो”* घोषणा देत आनंदाचा जल्लोष साजरा करण्यात आला व यावेळी पेढे वाटप करण्यात आले. भारतीताई पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्याची मान गर्वाने उंचावली आहे व केंद्रीय मंत्री पदाचा मान प्रथमच एक महिला म्हणून महिलेला मिळाला त्याचा संपूर्ण महिला वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close