ताज्या घडामोडी

खाजगी कोविड सेंटर्सची सीआयडी चौकशी करा ; अन्यथा १२ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन : संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचा इशारा देण्यात येत आहे*.

*खाजगी कोविड सेंटर्सची सीआयडी चौकशी करा ; अन्यथा १२ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन : संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचा इशारा देण्यात येत आहे*.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सांगली जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी कोविड सेंटरच्या डॉक्टर आणि स्टाफची सीआयडी चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा १२ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीन देण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यामध्ये बामणोली येथील दुधनकर हॉस्पिटल, मिरजेतील सेवासदन, मिरज चेस्ट आणि सिनर्जी हॉस्पिटलची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या लाटेत खाजगी रुग्णालयातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील व सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी कोविड हॉस्पिटल मध्ये जे रुग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत त्यामध्ये विशेष करून अपेक्स हॉस्पिटल मिरज वर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचप्रमाणे बामनोली येथील डॉक्टर महेश दुधनकर यांचे दुधनकर हॉस्पिटल, डॉक्टर रविकांत पाटील यांचे मिरज चेस्ट हॉस्पिटल, डॉक्टर रवींद्र आरळी यांचे सिनर्जी हॉस्पिटल यांच्यासह इतर सर्व खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये मयत रुग्णांची सीआयडीमार्फत डेथ ऑडिट करून त्याची सखोल चौकशी करून कारवाई कारवाई करण्यासंदर्भात 15 जून रोजी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. याउलट मंगळवारी दुधनकर हॉस्पिटलचे डॉक्टर महेश दुधनकर यांनी जाहीररीत्या मी कोणत्याही चौकशीस तयार आहे आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये फक्त ८० मृत्यू झालेले आहेत असे वक्तव्य केले. त्यामुळे दुधनकर यांनी हा प्रकार केल्यामुळे दूधनकर हॉस्पिटल मध्ये झालेल्या 80 मृत्यूविषयी संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे दुधनकर हॉस्पिटल बामनोळी यासह मिरज चेस्ट हॉस्पिटल, सिनर्जी हॉस्पिटल यांच्यासह इतर सर्व खाजगी कोविड सेंटर्सच्या सीआयडी चौकशीचे आदेश ११ जुलै पर्यंत द्या अन्यथा १२ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेश कंबळे यांनी दिला आहे.
*प्रतिनिधी सुरज शेख माधवनगर*
*सांगली जिल्हा हेड विजय तिकोटी*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close