ताज्या घडामोडी

माथेरान पायथ्याशी असलेल्या खोंडातील आदिवासी गावाला येण्या जाण्यासाठी जीव घालावा लागतोय धोक्यात

माथेरान पायथ्याशी असलेल्या खोंडातील आदिवासी गावाला येण्या जाण्यासाठी जीव घालावा लागतोय धोक्यात

लोखंडी शिडीसाठी दानशूर वक्तीच्या शोधात ग्रामस्त

चंद्रकांत सुतार–माथेरान

भारत देश स्वातंत्र्य होऊन काळ लोटला आहे, मानावाने परिस्थिती नुसार निसर्गाला आवाहन देत एका पेक्षा एक प्रगती केली आहे करत आहे, परंतु भारता सारख्या प्रगत देशात आजही अनेक गावे वस्ती वाड्या दुर्लक्षित राहिले आहे, थंड हवेचे माथेरान च्या पायथ्याशी असलेल्या वरोसा, उंबरवाडी , पिरकट वाडी तीन वाड्यांचा खोंडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या आदिवासी गावांना आपले उपजीविका साठी मोलमजुरी कामासाठी माथेरानलाच यावे लागते, यासाठी गावापासून छोट्या पायवाटेने चढाव चढत माथेरानला पोहोचायला दोन ते अडीज तास लागतात प्रचंड चढाव त्यातच अगदी पाय बसेल येवढिच पाऊल वाट आणि पुढे पुढे अश्यक्यप्राय अश्या किमान तीन पस्तीस ते चाळीस फूट उंच लाकडी शिडी चढून आजूबाजूला खोल दरी अश्या अवस्थेत ह्या दरीतुन जीवघेणा प्रवास करत ही मंडळी रोज, वर्षोनुवर्षे येथून ये जा करत आहेत,उन्हाळात,गरमी चा त्रास तर पावसाळ्यात येता जाता शिडी ठिकाणी पावसाने वहात आलेल्या पाण्याचा लोंढा अंगावर घेत ही मंडळी जात येत असते, अश्या वेळी वरून दरड वाहत आला तर तो सरळ एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे, वर चढत असताना तहान लागतेच अशा वेळी कसले शुद्ध पाणी नी कसले पाणी याचा मनात किंचितही शंखा न ठेवता तेथेच कुठेही वाहत असलेल्या झऱ्याच्या पाण्याने आपली तृष्णा भागवताना दिसतात, पूर्वी पासून तीन अवघड ठिकाणी लोखंडी शिडी होती पण २६ जुलै २००५ च्या महाप्रलय पावसामुळे येथील मोठ्या प्रमाणात भुतखलंन झाल्याने ह्या शिड्याही वाहून गेल्या त्या नंतर काही वर्षे ही मंडळींनी लाकडाच्या खाब्या द्वारे जीवघेणा प्रवास केला,त्याच वेळी गुजरात भवन हॉटेल चे मालक उमेशभाई दुबल मित्र परिवाराने त्याच्या ह्या असाह्यतेला हातभार लावत दोन लोखंडी शिडी बनवून दिल्या, आदिवासी बांधवांना काही काळच याचा उपयोग करता आला कारण नियतीने पुन्हा २६ जुलै २०१९ च्याच प्रचंड पावसामुळे डेंजर पाथ वरील मोठाले दरड व माती वाहून गेल्याने त्याच्या जोरदार प्रवाहाने येथील संपूर्णच भागच नष्ट झाला होत्याचे नव्हते झाले नवीन शिडी च काय पण पायवाट ही राहिली नाही, शेवटी श्रमदानातून येण्या जाण्यासाठी एक लाकडी शिडी पायवाट करण्यात आली आहे केवळ पोटासाठी कुटूंबासाठी काहीही जीवघेणे काम करावे लागते ४० फूट शिडी वरून काहीही सामान घेऊन चढ उतार करताना पाय निसटला तोल गेला की मृत्यू लाच आमंत्रण असणार यात शंखा नाही, माथेरानचे ग्रामदैवत पिसारनाथ चे उगम स्थान येथेच आहे , येथून येता जाता पिसारनाथ चे दर्शन घेऊन च ही मंडळी आम्हाला सुखरूप ठेवा ह्या प्रार्थना करूनच पुढे मार्गस्थ होत असतात किंबहुना पिसारनाथ च्या आशीर्वादानेच अशी मोठी घटना इथे घडली नाही दैवबलत्त्तर म्हणूनच हे जरी खरे असले तरी ह्या गावा साठी शासनाने कायम स्वरूपी रस्त्या साठी काहीतरी मार्ग काढल्यास नक्किच खोंडा गावाचा मार्ग मार्गस्थ होईल

शिडी साठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे
संपर्क ग्रामस्थ
राजू उघडे–7218333590
देहू पारधी–9307794804

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close