ताज्या घडामोडी

भीमाशंकर च्या जंगलात रस्ता चुकलेल्या पर्यटकांची पोलिसांनी केली सुटका ….. सर्व पर्यटक सुखरूप

भीमाशंकर च्या जंगलात रस्ता चुकलेल्या पर्यटकांची पोलिसांनी केली सुटका …..
सर्व पर्यटक सुखरूप

नेरळ : दिपक बोराडे

भीमाशंकरच्या जंगलात ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटक रस्ता चुकले जंगलात भरकटले रात्रीची वेळ असल्याने त्यांना रस्ता सापडला नसल्याने त्यांनी पोलिस हेल्पलाईन ला फोन केला असता पोलिसांनी ही तात्काळ दखल घेऊन भीमाशंकरचे जंगल गाठले स्थानिकांच्या मदतीने तब्बल चार तास जंगलात फिरून शोध घेतला व नऊ पर्यटकांची सुखरूप सुटका केली ,
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नेरुळ कामोठे येथील एक मुलगा व चार महिलासह चार पुरुष एकूण नऊ पर्यटक ट्रेकिंग साठी भीमाशंकरच्या जंगलात आले होते मात्र ट्रेकिंग करून परतत असतांना रस्ता चुकले व घनदाट जंगलात भरकटले रात्रीची वेळ असल्याने ,वन्यप्राण्यांच्या भीतीने पुरते घाबरून गेले होते ,दाट अंधारात जंगलात रस्ता शोधत असतांना त्यांची पुरती दमछाक झाली होती ,सुदैवाने एका पर्यटकांच्या मोबाईलवर नेटवर्क आले व त्यांनी पोलीस हेल्पलाईन ला संपर्क करून मदतीसाठी विनंती केली , त्याची नेरळ पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी संजय बांगर यांनी दखल घेतली व तात्काळ कळंब पोलीस कर्मचाऱ्यांना शोध घेण्यासाठी पाठविले, वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार कळंब पोलीस चौकीचे पोलीस उप निरीक्षक केतन सांगळे ,पोलीस हवालदार योगेश गिरी, पो शिपाई निरंजन दवणे ,होमगार्ड मनीष खुणे यांनी तातडीने भीमाशंकर जंगल गाठले, स्थानिकांच्या मदतीने जंगलात शोध मोहीम राबविली तब्बल चार तासाच्या शोधा नंतर रात्री दोन वाजताच्या सुमारास ते नऊ पर्यटक पोलिसांना सुखरूप सापडून आले ,या कामी खांडस वअंभेरपाडाचे पोलीस पाटील, भारती खटके ,ग्रामपंचायत सदस्य अंकुश ऐनकर यांनी सहकार्य केले ,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close