ताज्या घडामोडी

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची प्राणज्योत मावळली* *मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास*

प्रतिनिधी सुरज शेख माधवनगर* *सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी*

*हेडर-बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची प्राणज्योत मावळली*

*मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास*

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार दिलीप कुमार यांनी केली होती. त्यानंतर रविवारी सकाळी पत्नी-अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टर जलील परकार त्यांच्यावर उपचार करत होते. दिलीप कुमार यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली होती.सायराबानो यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की दिलीप कुमार यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा खूपच खालावली आहे. त्यांची प्रतिकारशक्तीही कमी झाली आहे, ज्यामुळे जास्त चालू शकत नाहीत. त्यांना चालताना नेहमीच आधाराची गरज भासते. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तानातील लाहोर मध्ये झाला ज्वार भाटा 1944 हा त्यांचा पहिला आणि किला 1998 हा शेवटचा चित्रपट होता. भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण 1991 आणि नंतर पद्मविभूषण 2015 या पदव्यांनी सन्मानित केले आहे याशिवाय त्यांना 1994 साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी आज जगाचा निरोप घेतला. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मानवली. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार यांना सावली सारखी सोबत देणाऱ्या त्यांच्या पत्नी सायराबानो कोलमडून गेल्या आहेत. 1 / 8 बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची आज जगाचा निरोप घेतला. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मानवली. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून दिलीप कुमार अंथरूणावर होते. सायरा यांनी अगदी तळहाताच्या फोडासारखे त्यांना जपले होते.पण आज सायरा यांना मागे सोडून दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर सायरांची अवस्था हृदय हेलावून टाकणारी होती.दिलीप कुमार यांचे पार्थिव रूग्णालयातून घरी आणले, त्यावेळी सायरा त्यांच्या पार्थिवाशेजारी बसून होत्या. रूग्णवाहिकेत दिलीप कुमार यांचे पार्थिव होते आणि सायरा त्यांच्या पार्थिवाकडे एकटक बघत होत्या. सायरा यांच्या डोळयांतील अश्रू थांबत नव्हते. सायरांनी शेवटपर्यंत पतीची सोबत दिली. सायरा यांनी दिलीप कुमार यांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली, त्यांचा सांभाळ केला.दिलीप कुमार व सायरा यांच्या वयात मोठा फरक होता. पण हा फरक त्यांच्या प्रेमाआड कधीच आला नाही.लग्नानंतरही सायरा चित्रपटात काम करत होत्या. पण 1976 नंतर त्यांनी काम थांबवून पूर्णवेळ पतीसाठी दिला. दिलीप कुमार यांना सायरा बानो कोहिनूर मानत. एक अनमोल कोहिनूर मला देवाने दिला आहे, असे त्या म्हणत, त्या प्रत्येक मुलाखतीत देवाचे आभार मानत.
*प्रतिनिधी सुरज शेख माधवनगर*
*सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी*Ī

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close