आरोग्य व शिक्षण

विद्यापीठ उपकेंद्र सांगली मध्ये होण्यासाठी गुरुवारी बैठक: ॲड. अमित शिंदे*

*विद्यापीठ उपकेंद्र सांगली मध्ये होण्यासाठी गुरुवारी बैठक: ॲड. अमित शिंदे*

सांगली दि.: शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली मध्ये होण्यासाठी विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीच्या माध्यमातून तीव्र लढा उभारला जाणार आहे. त्यासाठी सांगली मिरज मधील लोकप्रतिनिधी, शिक्षण संस्था चालक, विद्यार्थी व पालक यांची संयुक्त बैठक गुरुवारी आयोजित केल्याची माहिती कृती समितीचे निमंत्रक ॲड. अमित शिंदे यांनी दिली

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र जिल्ह्यामध्ये कुठे करायचे याबाबत वाद पेटला आहे. हे उपकेंद्र सांगली मध्ये होण्यासाठी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपकेंद्र कृती समिती स्थापन करून लढा चालू केला आहे. त्याच बरोबर खानापूर, पेड व तासगाव याठिकाणी उपकेंद्र करावे यासाठीची मागणीदेखील तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. परंतु शिक्षण मंत्र्यांनी तासगाव तालुक्यामधील बस्तवडे येथील जागेला तत्वतः मान्यता दिल्याचे जाहीर केले. वास्तविक विद्यापीठाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून जिल्ह्याच्या मुख्यालयापासून पंचवीस किलोमीटरच्या आत मध्ये असणारी 75 ते 100 एकर जागा उपकेंद्रासाठी आरक्षित करून मागितली होती. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार हे विद्यापीठ जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणार आहे आणि एका जिल्ह्यासाठी एकच उपकेंद्र असणार आहे. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, विद्यार्थी, दळणवळणाच्या सोयी यांचा विचार करता जिल्ह्याचे उपकेंद्र हे जिल्ह्याच्या ठिकाणी होणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व मुख्य कार्यालय असतात. परंतु विद्यापीठ म्हणजे दुष्काळ निवारणाचे साधन असल्याचा प्रचार करत उपकेंद्र दुष्काळी भागात नेण्याची मागणी केली जात आहे. शिक्षण मंत्र्यांनी देखील कोणालाच विश्वासात न घेता परस्पर निर्णय जाहीर केलेला आहे. हा निर्णय शैक्षणिक स्वरूपाचा नियमबाह्य व पूर्णता चुकीचा आहे. त्यामुळे उपकेंद्र कृती समितीच्या माध्यमातून गुरुवार दि ८ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचे प्रमुख, शिक्षण संस्था चालक, विद्यार्थी व पालक यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. पंचमुखी मारूती रोड वरील कष्टकर्यांची दौलत या ठिकाणी ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये उपकेंद्र सांगली मध्ये होण्यासाठी तीव्र आंदोलन उभारण्याबाबत दिशा निश्चित करण्यात येईल असे अमित शिंदे यांनी सांगितले

यावेळी जयंत जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थीचे शुभम जाधव, महालिंग हेगडे, शुभम ठोंबरे, रोहित शिंदे, दिग्विजय कांबळे, आदित्य नाईक, प्रवीण कोकरे, ॲड. जगदीश लिमये, अल्ताफ पटेल, संतोष शिंदे, अक्षय दासरी तेजस नांद्रेकर, अभिषेक खोत उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close