ताज्या घडामोडी

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्याबद्दल आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, आयुष्यमान प्रतिष्ठाण मुंबई, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचा मार्फत यांचे सत्याग्रह आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आले

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्याबद्दल आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, आयुष्यमान प्रतिष्ठाण मुंबई, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचा मार्फत यांचे सत्याग्रह आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आले

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्याबद्दल आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, आयुष्यमान प्रतिष्ठाण मुंबई, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचा मार्फत यांचे सत्याग्रह आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आले यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनेक संस्था, संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी विरोधी पक्ष नेते मा प्रवीण दरेकर यांनी सत्याग्रहाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेऊन विधान सभेत मागण्या मांडण्याचे आश्वासन दिले.

वर्धा , चंद्रपूर , गडचिरोली याजिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आल्याने राज्यातील अनेक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी ही नशा बंदी हटविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला
यावेळी नशाबंदी महाराष्ट्र राज्य राज्य सरचिटणीस श्रीमती वर्षा विद्या विलास निमंत्रक श्री अविनाश पाटील , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष अॅड.डॉ.विक्रांत वाघचौरे,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री अशोक लांडगे , राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री भरत चवरे, राष्ट्रीय सरचिटणीस श्री गणेश वाघचौरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री केतन पाटील, जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य श्री विवेक साळवी, आयुषमान प्रतिष्ठानचे सरचिटणीस सौ सुप्रिया जाधव लांडगे, दिपक जाधव तसेच अनेक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close