ताज्या घडामोडी

राज्यमंत्रीबच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त पाटोदा येथे १०१ रक्त पिशव्यांचे संकलन

 

राज्यमंत्रीबच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त पाटोदा येथे १०१ रक्त पिशव्यांचे संकलन
१४५ लोकांची नेत्र तपासणी तर ४५ चष्म्याचे वाटप
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त येवला तालुका प्रहार संघटना व शिवजन्मोत्सव समिती पाटोदा यांच्या वतीने रक्तदान,मोफत नेत्र तपासणी शिबीर व गरजूंना मोफत घरपोच रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम प्राथमिक आरोग्यकेंद्र पाटोदा येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी १०१ रक्त पिशव्यांचे संकलन होऊन या१४५ लोकांची नेत्र तपासणी होऊन ४५ रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी होते तर प्रमुख पाहुणे प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडखे,जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर,येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप कोळी,समाजसेवक गोरख पवार,सागर थोरात,सिद्धेश अट्टल,समाधान बागल उपस्थित होते
अध्यक्षीय भाषणातअनिल भवारी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणार्या प्रहार संघटनेचे काम सर्वच क्षेत्रात कौतुकास्पद असून ग्रामीण भागात शेत रस्ते व बांधावरून होणारे वाद समजुतीने आपापसात समोपचाराने मिटविण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
कुठल्याही पक्षाचा पाठींबा नसूनही सलग चार वेळा केवळ कामाच्या बळावर जनतेची मने जिंकत निवडून येणाचा आदर्श इतर लोक प्रतिनिधींनी घ्यावा आजही जनता खरं काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभी राहते.प्रहार च्या कार्यकर्त्यांनी जनतेची पंचायत समितीशी संबंधित कुठलीही कामे घेऊन यावीत ती करण्याचा प्रयत्न मी स्वतः कसोशीने करेन असे आवाहन
सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले
गरजू जनतेची सत्तर हजारावर ऑपरेशन मोफत करून प्रत्येक तालुक्यात रुग्णसेवक नेमून लाखो रुग्णांना जीवदान देणारे नामदार बच्चू कडू एक आदर्श लोकप्रतिनिधी आहेत
असे डॉ सुरेश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालेगाव रक्त पेढी मालेगाव व दिया आयकेअर हॉस्पिटल मालेगाव, शिव जयंती ऊत्सव समिती पाटोदा, प्रहार संघटना पाटोदा गट,शाखा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
यावेळी रामभाऊ नाईकवाडे गणेश बोराडे सुनीलभाऊ पाचपुते
संजुभाऊ मेंगाने चेतन बोरणारे शाम मेंगाने साईनाथ दिवटे किशोर भोसले धनंजय खरोटे सोमनाथ भुसारे शुभम बोरणारे बाळू बोराडे हरीश पाचपुते समाधान शेटे मंगेश आढाव विपुल कानडे उत्तम बोराडे बाळू पाचपुते एकनाथ जाधव समाधान चौघुले जगदीश बोराडे सुनील बोराडे श्रीनिवास बोनाटे विशाल वरे
इ कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close