ताज्या घडामोडी

*रात्री बातमी सकाळी इफेक्ट,स्वच्छता विभागाला आली जाग*

*रात्री बातमी सकाळी इफेक्ट,स्वच्छता विभागाला आली जाग*

चांदवड-सुनील अण्णा सोनवणे

चांदवड नगरपरिषद हद्दीतील महात्मा फुले नगर च्या सुरुवातीस कचरा असल्याबाबतचे वृत्त काल रात्री वेब पोर्टल ला येताच आज सकाळी नगरपरिषदेने स्वच्छता कर्मचारी पाठवून घाण कचरा साफसफाई केली. याबाबत शिवसेना चांदवड शहर संघटक प्रसाद प्रजापत, मनोज जाधव,सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर भावसार यांनी सदर प्रकरणाचा चांगलाच समाचार घेतला.वारंवार अस्वच्छता, स्ट्रीट लाईट बंद, अश्या तक्रारी करूनही नगरपरिषद दुर्लक्ष करीत असते असे नागरिकांनी सांगितले.घंटागाडी व पाणीपुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे अश्या महत्वाच्या बाबींकडे नगरपरिषद केव्हा लक्ष देईल देव जाणे??
शहरातील नागरिकांनी फलक तयार करून लावण्याची वेळ येणे म्हणजे नगरपरिषद साठी नामुष्कीच म्हणावे लागेल,मात्र आता तरी अधिकारी वर्गाला जाग येईल का असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर बातमी आल्याशिवाय चांदवड नगरपरिषदेचे अधिकारी यांना जाग येत नाही असेच म्हणावे लागेल चांदवड नगर परिषद स्वच्छता व आरोग्य विभाग हा सेवा पुरविण्यास कुचकामी ठरत आहे तरी नगर परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम , स्वच्छता व आरोग्य विभागाने चांदवड परिषदेच्या हद्दीतील नागरिकांचे आरोग्य कसे व्यवस्थित राहील याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे गाड्यांची नादुरुस्ती, कामगारांची कमतरता नगरपरिषदेने त्वरित भरून काढावी व चांदवड कर यांचे जनजीवन सुरळीत करावे एक जुलैपासून सर्व विभागात स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल व घंटागाडी वेळेवर येईल असे आश्वासन नगरपरिषद चे शिव यांनी दिले होते परंतु त्याचे पुढे काय झाले हे काही समजू शकले नाही चांदवड नगरपरिषदेला कोणीही वाली राहिला नाही अशी दबक्या आवाजात चर्चा संपूर्ण गावातून सुरू आहे नगरपरिषदेचे अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करून नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहे हेच म्हणावे लागेल

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close