ताज्या घडामोडी

*त्या वृद्धाला अखेर नातेवाइकांनी नेले घरी… पोलीस टाईम न्युजच्या बातमीची दखल

*त्या वृद्धाला अखेर नातेवाइकांनी नेले घरी… पोलीस टाईम न्युजच्या बातमीची दखल*

        सावदा प्रतिनिधी फरीद शेख      

सावदा जनता तोल काट्याच्या समोरील नाल्यावरील पुलाखाली एका वृद्ध माणूस मरण यातनेत…! या मथळ्याखाली दिनांक ३ जुलै रोजी *पोलीस टाईम न्युज* मध्ये सविस्तर रीत्या प्रसिद्ध करण्यात आलेली बातमी मध्ये सदरील वृद्धाची अवस्था पाहून माणुसकीचे नाते जपणाऱ्यांनी जपले परंतु आत्ता रक्ताचे नाते असलेल्यांची भूमिका कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे हा विशेष उल्लेख होता आणि यास मानदेवून नातेवाईकांनी अखेर “देर आये दुरुस्त आये”या प्रसिद्ध म्हणीला अनुसरून त्या वयस्कर वृद्धास सावदा – फैजपूर रस्त्यावरील मनाली हॉटेल समोर पुलाखाली जखमी अवस्थेत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या वृद्धाला व्यवस्थित रित्या उचलून घरी नेलेल्याची सुखद व चांगली माहिती मिळाली

याबाबत सावदा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष एपीआय देविदास इंगोले, राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते फिरोज खान पठाण, समीर खान अखतर खान, पत्रकार फरीद शेख, मुख्तार शेख अरमान यांनी समाधान व्यक्त केले सदरील वृद्ध व्यक्तीची काळजी घेऊन त्यास त्वरित पुलाखालून उचलून घरी नेणाऱ्या नातेवाईकांचे कार्य सुद्धा कौतुकास्पद व मनपूर्वक अभिनंदनास पात्र आहे सदरची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close