ताज्या घडामोडी

सावदा नगरपरिषद येथे लेखापरीक्षक पदावर भारती पाटील, लेखापाल पदाचा सुद्धा अतिरिक्त कारभार…*

*सावदा नगरपरिषद येथे लेखपरीक्षक पदावर भारती पाटील, लेखापाल पदाचा सुद्धा अतिरिक्त कारभार…*

 जळगाव जिल्हा :-3/07/2021

       सावदा प्रतिनिधी फरीद शेख       

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील नगरपरिषद येथे दि. ३० जून रोजी नियत वयोमानानुसार लेखा विभागाकडील लेखापाल पदावर कार्यरत
असलेले वसंत दशरथ महाजन तसेच नगरपरिषद येथे प्लंबर पदावर असलेले प्रदीप घन:शाम बेंडाळे सेवानिवृत्त झाले.
लेखापाल पदावर कार्यरत असलेले वसंत महाजन यांचे कडील लेखापाल पदाचा अतिरिक्त पदभार
लेखापरीक्षक पदावर नियुक्त असलेल्या भारती रमेश पाटील याना देण्यात आला. पदभार स्विकारल्यानंतर
नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून सर्व अभिलेख व आवश्यक ती कामे वेळच्या वेळी, पूर्ण
करून शासनास योग्य ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी नगरपरिषद चे मुख्याधिकारी सौरभ जोशी, प्रशासकीय अधिकारी सचिन चोळके
सेवानिवृत्त झालेले वसंत महाजन, वरिष्ठ लिपिक सतीश पाटील, बांधकाम विभागातील अभियंता धनराज राणे, अविनाश गवळे, पाणीपुरवठा अभियंता जितेश पाटील, करनिरिक्षक अनिल आहुजा, स्वच्छता निरीक्षक महेश चौधरी,
नगरचना अधिकारी ऐश्र्वर्या पिंगळे, शहर समन्वयक अरुणा चौधरी तसेच मनोज चौधरी, विनय खक्के,
विमलेश जैन, संदीप पाटील, धीरज बनसोडे किरण चौधरी आदी कर्मचारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close