ताज्या घडामोडी

मुनमुन दत्ता या अभिनेत्रीला.* *अटक व्हावी असे आशयाचे* *निवेदन बाल्मीकि विकास संघाने* *केंद्रीय सामाजिक न्याय* *मंत्री रामदास आठवले* *यांना देण्यात आले.*

*मुनमुन दत्ता या अभिनेत्रीला.* *अटक व्हावी असे आशयाचे* *निवेदन बाल्मीकि विकास संघाने* *केंद्रीय सामाजिक न्याय* *मंत्री रामदास आठवले* *यांना देण्यात आले.*

*भारती धिंगान* (प्रतिनिधी)  

मुंबई.तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील बबिता नामक भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ता या अभिनेत्रीने यूट्यूब चैनल वर मुलाखती दरम्यान अभद्र भाषेत बाल्मीकि समाजाचा अपमान कारक शब्दाचा प्रयोग केला. याबाबत आंबोली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 प्रमाणे (एक्ट्रा सिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु त्यावर आजपावेतो कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने बाल्मीकि समाजात असंतोष पसरलेला आहे. तसेच ही केस ओशिवारा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील बोंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी असे आशयाचे निवेदन देण्यात आले. मा. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी बाल्मीकि विकास संघाची लवकरच मागणी पूर्ण करतो. असे आश्वासन दिले. यावेळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामवीर पारचा, मुंबई कार्याध्यक्ष धर्मवीर करतीया, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नरेश बोहित, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत साहेबांनी सविस्तर प्रकार जाणून घेऊन आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल बाल्मीकि विकास संघाचे मुंबई अध्यक्ष विनोद भाई कजानिया यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close