ताज्या घडामोडी

वेदनादायक :-सावदा जनता तोल काट्याच्या समोरील नाल्यावरील पुलाखाली एका वृद्ध माणूस मरण यातनेत…!*

*वेदनादायक :-सावदा जनता तोल काट्याच्या समोरील नाल्यावरील पुलाखाली एका वृद्ध माणूस मरण यातनेत…!*

       सावदा प्रतिनिधी फरीद शेख       

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा – फैजपूर रोडवरील जनता टोल काट्याच्या समोरील नाल्यात हॉटेल मनाली जवळ पुलाखाली एक वयस्कर वृद्ध माणूस अतिशय बिकट व हलाखीच्या परिस्थितीत गंभीर अवस्थेत पडलेला असून जागीच त्यांनी अंगातील सराई मध्ये नैसर्गिक विधी केल्याने दुर्गंधीमुळे तसेच त्याच्या कमरेखालील जखम असल्याने त्या वृद्धाच्या शरीरावर माकोडे, माशा, चालताना बसताना दिसत असलेला हा वेदनादायक दृश्य समोर दिसत होता व आहे

याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक ३ जुलै २०२१ रोजी दुपारी सावदा – फैजपूर रोडवरील हॉटेल मनाली समोर असलेल्या पुलाखाली अतिशय बिकट अवस्थेत पडलेल्या वृद्धा जवळ पाण्याची बॉटल बिस्कीटचे पुडे देऊन त्याची विचारपूस व चौकशी राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते फिरोज खान पठाण, समीर खान हे करतांना दिसले असता फैजपूर कडून मोटरसायकलने येत असलेले पत्रकार फरीद शेख,व मुख्तार शेख अरमान या ठिकाणी थांबले असता सदरील वृद्ध नाल्या खाली मरण्यातनेत दिसून आला त्यावेळी शेख मुख्तार यांनी वृद्धास पाणी पाजले. जवळपास दोन महिन्यापासून जनता तोल काटा व हॉटेल मनाली परिसरात हा वृद्ध व्यक्ती असल्याची माहिती समजली सदरील वृद्ध व्यक्ती हा कोचुर येथील रहिवासी असल्याचे व त्याचे नाव बद्रीनाथ आहे अशी माहिती समजली तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असताना रात्री-बेरात्री कमी जास्त पाऊस पडल्यामुळे सदरील नैसर्गिक नाल्यास पूर आल्यास या वृद्ध व्यक्तीची प्राणहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही म्हणूनच घटनास्थळावरून नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी सावदा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष एपीआय देविदास इंगोले यांना फोन लावून सदरची माहिती दिली नंतर संध्याकाळ पर्यंत सदर विरुद्ध बाबत कोचुर येथून माहिती काढून त्याला व्यवस्थित रित्या त्याच्या घरी पाठवण्याची योग्य सोय लावण्यात येईल असे एपीआय देविदास इंगवले यांनी फोनवरून सांगितले

सदरील विरुद्धची अवस्था पाहून माणुसकीचा नाता जपणाऱ्यांनी जपला परंतु आता रक्ताचे नाते असलेल्यांची भूमीकाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close