ताज्या घडामोडी

ओझर विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्या. राष्ट्रीय दलित पॅथंर ची विभागीय आयुक्त यांचेकडे निवेदनद्वारे मागणी ,

  ओझर विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्या. राष्ट्रीय दलित पॅथंर ची विभागीय आयुक्त यांचेकडे निवेदनद्वारे मागणी ,
नाशिक शांताराम दुनबळे. नाशिक-: कर्मवीर रिपब्लिकन सेनानी दादासाहेब गायकवाड विमानतळ (ओझर) नामकरण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय दलित पॅथंर तर्फे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय उपध्यक्ष बुलंद तोफ भिमकवी विजयराज पगारे यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे कङे निवेदनद्वारे केली आहे .
सन १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर भारत आणि रशिया या देशाची मैत्री होऊन लढाऊ मिग विमानांचा कारखाना भारतात उभारण्याचे ठरले असतांना तो बंगलोर येथे होणार हे कळताच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भारताचे तात्कालीन संरक्षणमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांना आग्रह करून हा विमान कारखाना नाशिकला ओझर येथे उभारण्यास मंजुरी मिळवली. त्यालाच आपण एच.ए.एल. कारखाना असे म्हणतो. या कारखान्याचाच एक भाग म्हणून ओझर विमानतळ सुरू करण्यात आले आहे.
या सर्व मूळ प्रक्रियेमध्ये मा.दादासाहेब गायकवाड यांचा सहभाग असल्यामुळे व ते या भागाचे भूमिपुत्र असल्याने,त्याकाळात या संसदीय क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून(खासदार) काम केल्याने व सध्या या विमानतळाला कोणत्याही व्यक्तीचे नाव प्रस्तावित नसल्याने राष्ट्रीय दलित पॅथंर आबेङकर चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी आहे की, या विमानतळाला
*कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड* यांचे नाव देवून या विमानतळाचे महत्त्व अधिक वाढेल.अशा मागणीचे निवेदन देण्यात आले निवेदनात दादा साहेब गायकवाड यांचे जन्मगांव आंबे ता दिङोरी येथील अपूर्ण दादासाहेब गायकवाड स्मारक पुर्ण करण्यात यावे, नाशिक येथील व्दारका उड्डाणपूलास लोककवी वामनदादा कर्ङक नाव देण्यात यावे आदी मागणी करण्यात आल्या असुन मागण्याची पुर्तता करण्यात यावी अशी मागणी केली आहे अन्यथा राष्ट्रीय दलित पॅथंर तर्फे राज्य भर ङरकाळी आदोंलन छेङण्यात येईल अशा इशारा राष्ट्रीय उपध्यक्ष विजयराज पगारे यांनी दिला आहे विभागीय आयुक्त साहेब यांना भेटलेल्या शिष्टमंडळाची त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होऊन विभागीय आयुक्त यांनी योग्य ती कार्यवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले
शिष्टमंडळात राष्ट्रीय दलित पॅथंर राष्ट्रीय उपध्यक्ष विजयराज पगारे, नाशिक जिल्हा अध्यक्ष मोहन खरे,रूपेश सोनवणे, नानासाहेब काळे,सागर कङवे ,शुभम पवार, अधिराज पगारे, देवराज पगारे, सह पदाधिकारी व कार्यकर्ते
आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close