ताज्या घडामोडी

सावद्यात घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गरजु लाभार्थ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी…!*

*सावद्यात घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गरजु लाभार्थ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी…!*

.पा. विरोधी गटनेते फिरोज खान पठाण सह राष्ट्रवादीचे दोन नगरसेवकांनी मुख्याधिकारी कडे निवेदनाद्वारे केली मागणी.

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पालिका हद्दीत गरजुं नागरिकांनी शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी नियमानुसार पालिकेत आवश्यक कागदपत्र सादर करून घरकुलांचे सुरू केलेले काम अनेक दिवसापासून निधीअभावी अर्धवट अवस्थेत बंद पडल्याने गोरगरीब गरजू यांना विविध प्रकारचे त्रास सहन करावे लागत आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते फिरोज खान पठाण, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे व सिद्धार्थ बडगे यांनी सावदा पालिकेचे मुख्याधिकारी श्री सौरभ द जोशी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की सावदा नगरपरिषद अंतर्गत डी पी आर क्रं.१(२३७) दि.८ मार्च २०१९ रोजी मंजूर झालेला आहे या प्रकल्प अहवालाची आतापर्यंत फक्त राज्य शासनाने प्रथम हप्ता ४०,००० हजार प्रमाणे एकूण ९४.८० लक्ष निधी प्राप्त असून सदर निधीतून गरजू घरकुल लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आले होते सबब लाभार्थ्यांनी आपले राहते घर उकलून घरकुलाचे नवीन बांधकाम सुरू केले परंतु पुढील निधीअभावी त्यांचे घर बांधकाम अर्धवट अवस्थेत बंद पडलेले आहे यामुळे त्यांना पावसाळ्याचे दिवस लागल्या पासून जास्त त्रास वाढल्याने त्यांची अधिक गैरसोय होत आहे त्याच बरोबर पैशा अभावी लाभार्थ्यांचा घरकुल बांधकाम सातत्य राहत नसल्यामुळे त्यांचे गवंडी, मिस्त्री हे सुद्धा कायम टिकून राहत नाहीत पर्यायाने त्यांना होत असलेल्या गंभीर त्रासामुळे नगर नगरपरिषदेवर रोष व्यक्त केला जात आहे सबब गरजू लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा प्रथम हप्ता निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी श्री सौरभ जोशी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, गृहनिर्माण मंत्री, पालक मंत्री जळगांव जिल्हा, आमदार साहेब मुक्ताईनगर मतदार संघ, मुख्य अभियंता -२ प्रधानमंत्री आवास योजना महाडा यांना पाठवण्यात आले आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close