ताज्या घडामोडी

वसई विरार जिल्हयाचे उपाध्यक्ष श्री मनोज पाटील यांचा वसई विरार शहर महानगरपलिकेला सवाल..

वसई विरार जिल्हयाचे उपाध्यक्ष श्री मनोज पाटील यांचा वसई विरार शहर महानगरपलिकेला सवाल.

        सुहास पांचाळ  

नालासोपारा/ दि. २ जुलै : वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात सामान्य नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे.ज्या लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे.त्या ठिकाणी नागरिकांना देण्यात येणाऱ्या लसीची संख्या देण्यात आली नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. असाच प्रकार उद्या शनिवार, दिनांक 3 जुलै २०२१ रोजी लस दिल्या जाणार्‍या केंद्रांची यादी दिली आहे ; परंतु कोणत्या केंद्रावर किती डोस उपलब्ध आहेत हे नमूद नाही. सामान्य माणसापासून ही माहिती का लपवली जात आहे ? हा प्रकार दुसर्‍यांदा वसई तालुक्यात झालाय असे त्यांचे म्हणणे आहे. एका विशिष्ट ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध करून दिले जातात अणि ते लोकांसमोर येऊ नये म्हणुन हा खटाटोप महापालिका प्रशासन करत आहे का ? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close