ताज्या घडामोडी

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे चांदवड शहरात लाक्षणिक उपोषण*

*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे
चांदवड शहरात लाक्षणिक उपोषण*

चांदवडु तालुका प्रतिनिधी: सुनिलआण्णा सोनवणे

आज चांदवड येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या नेतृत्वाखाली चांदवड शहरातील सर्व ओ.बी.सी समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द केलेल्या ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवणे करिता आवश्यक ईम्पिरिकल डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा व केंद्र/राज्य सरकार द्वारा ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करावा.
या मागणीसाठी महाराष्ट्र तैलिक महासभेच्या नेतृत्वात चांदवड शहर ओबीसी संघटना व शहरातील सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज शुक्रवार दि.२/७/२०२० रोजी सकाळी ११:०० वा प्रांतकार्यालय चांदवड येथे लाक्षनिक धरणे आंदोलन करण्यात येऊन मा.तहसीलदार तसेच मा.पोलीस निरीक्षक बारवकर चांदवड यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र प्रांतिक कार्याध्यक्ष व ओबीसी नेते श्री.अशोककाका व्यवहारे ओबीसी संघटना अध्यक्ष विजय सांबर जगनआबा राऊत ,विनोद सोनवणे, सचिन(गुड्डू)खैरनार, दिपकशेठ व्यवहारे, ह.भ.प बाळासाहेब कबाडे परदेशी तात्या, अल्ताफ तांबोळी, गारे, संजय क्षत्रीय, युवा अध्यक्ष संकेत राऊत, सुरेश बिल्लाडे, दत्तू सोनवणे, संतोष सुतारे, प्रभाकर खैरनार.योगेश बिरार, गणेश जगताप, राजु बिरार, दिपक शिरसाठ, बाळासाहेब वाघ, रमेश जाधव , निलेश चौधरी .पंकज राऊत महिला अध्यक्ष सौ.नेवगेताई
सौ.सोनवणे ताई सौ.लुटेताई सौ.राऊत ताई सौ.कर्डीले ताई सौ.पंडित ताई आदी ओ.बी.सी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close