ताज्या घडामोडी

कर्जत तालुका काँग्रेसची बैठक संपन्न ; आगामी काळातील जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूका स्वबळावरचा लढण्याचा निर्णय

कर्जत तालुका काँग्रेसची बैठक संपन्न ;

आगामी काळातील जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूका स्वबळावरचा लढण्याचा निर्णय

नेरळ : दिपक बोराडे

     कर्जत तालुक्यातील आगामी काळातील जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय तसेच त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी कर्जत तालुका काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन नेरळ येथे संजय गवळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते .

   काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ,कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची गरज असल्याचे मत संजय गवळी यांनी व्यक्त केले . तसेच आगामी सर्व निवडणूका स्वबळावर लढल्यासच काँग्रेसचं अस्तिव अबाधित राहील असे मत व्यक्त केले . अरविंद कटारिया यांनी सहकार क्षेत्रातील निवडुकात आपला सहभाग गरजेचा आहे असे सांगितले . तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख यांनी आतापासूनच निवडणुकीची रणनीती आखणे गरजेचे त्या दृष्टीने जिल्हा परिषद विभाग प्रमुख आदी पदाधिकाऱ्यांची गाव पातळीवर जाऊन निवड करावी असे मत व्यक्त केले . तर माजी तालुका अध्यक्ष अरविंद पाटील यांनी तालुक्यातील काँग्रेस पक्षाची दारुण अवस्था पाहता आत्मचिंतनाची गरज असल्याचे सांगत तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली . तर माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पादीर यांनी आपल्याच काँग्रेसचे महसूल ,बांधकाम मंत्री आहेत त्यामाध्यमातून विकास कामे आणा असे सुचविले . संतोष पेंडामकर यांनी या आढावा बैठकीत काँग्रेसच्या पुढील धोरणे काय असावीत याबाबत मत मांडले . संदीप पाटील यांनी बूथ कमिट्या नेमून पक्ष संघटना बळकट कारण्याबात आग्रह धरला . जेष्ठ नेते प्रमोद राईलकर यांनी पुढील निवडणूका पक्षाच्या चिन्हावर लढाव्यात अशी भूमिका मांडली . तर माजी तालुका अध्यक्ष रियाझ बुबेरे यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष घालावे अशी मागणी केली . जेष्ठ नेते चंद्रकांत मांडे यांनी सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्येही लक्ष घालावे अशा सूचना करत माझ्याकडून योग्य ते मार्गदर्शन पक्षाला लाभेल अशी ग्वाही दिली .मनोहर कदम यांनी हि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडू असा विचार मांडला .यावर सर्वानी मान्यता दर्शविली . जेष्ठ नेते सुभाष मदन यांनीही कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याबात चर्चा केली . बैठकीच्या शेवटी  तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी कोरोना काळामुळे काही कार्यक्रम करणे शक्य झाले नाही मात्र यापुढे असे होणार नाही , मतभेद विसरून सर्व एकत्र येऊन काम करू असे कार्यकर्त्यांना आश्वासित केले .

  या बैठकीला माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड ,तालुका चिटणीस संदीप सोनटक्के ,

अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष आवेश जुआरी ,बळीराम कोळंबे ,मनोहर पाटील

युवक काँग्रेस अध्यक्ष नेरळ शहर यतीन यादव ,नेरळ कार्याध्यक्ष संतोष पेडामकर

सुभाष मदन ,सुरेश चंचे , कर्जत शहर अध्यक्ष इरफान अत्तार ,युवक विधानसभा अध्यक्ष सागर परदेशी , संतोष बदे ,जग्गनाथ शेंडे ,रामदास घाटे ,

जक्की नजे,मंगळ माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close