ताज्या घडामोडी

डफळापूर बाजार पेठेमध्ये फिरत्या अंबुलन्स मधून व्यापारी आणि बाजारपेठेत येणार्या लोकांची कोरोना टेस्ट

डफळापूर बाजार पेठेमध्ये फिरत्या अंबुलन्स मधून व्यापारी आणि बाजारपेठेत येणार्या लोकांची कोरोना टेस्ट

डफळापूर प्रतिनिधी

डफळापूर बाजार पेठेमध्ये फिरत्या अंबुलन्स मधून व्यापारी वर्ग तसेच बाजारपेठेत येणार्या लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली
लोक आता आरोग्य केंद्रात तपासणी करण्यासाठी दुर्लक्ष करत असताना ग्रामपंचायत डफळापूर,प्रा. आ. केंद्र डफळापूर तसेच जत पोलिस स्टेशन जत यांच्या सहकार्याने बाजारपेठेमध्येच लोकांना कोरोना तपासणीसाठी मार्गदर्शन करून व्यापारी वर्ग व बाजारपेठेत येणाऱ्या लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली.
या स्तुत्य कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत डफळापूर ,वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित चोथे, जत पोलीस स्टेशन चे शंकर पवार व लोखंडे साहेब यांचे सहकार्य लाभले.
तसेच आरोग्य सेविका नीता सोहनी,सुनीता हताळे,स्वाती कांबळे, संजीव कोळी व क्लार्क प्रशांत बने यांनी कोरोना चाचणीसाठी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपली,
तालुक्यातून या नियोजनावर कौतुक करण्यात आले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close