ताज्या घडामोडी

नवी मुंबईत वर्षानुवर्ष शिपिंग क्षेत्रात होणाऱ्या लाखोंच्या फसवणुकीला नक्की कोणाचे अभय?

मुंबई: उपसंपादक राज्य:अफजल देवळेकर सरकार

नवी मुंबईत वर्षानुवर्ष शिपिंग क्षेत्रात होणाऱ्या लाखोंच्या फसवणुकीला नक्की कोणाचे अभय?

नवी मुंबईसारख्या विशेष व्यवसायिक दर्जा प्राप्त शहरात अनेक उद्योग चालतात. त्यातच शिपिंग क्षेत्रातली सिलिकॉन वॅल्ली म्हणून संपूर्ण देशातील तरुण मोठ्या आशेने येतात. येथे अनेक मरीन अकॅडेमी, शिपिंग कार्यालय आहेत त्याच बरोबर अनेक एजेंट आहेत.
नवी मुंबईच्या वाढत्या शहरीकरणा बरोबरच गुन्हेगारीच्या पद्धती देखील बदलत आहेत. तरुणांचे शिपिंग क्षेत्राकडे करियर म्हणून असणारे आकर्षण फसवणुकीस बळी पडत आहे. याकरिता सोशल मिडियाचा भरपूर वापर होतो. संबंधित कार्यालयाची जाहिरतबाजी केली जाते, त्या जाहिरातीला भुलून देशभरातील इच्छुक तरुणांनी प्रतिसाद दिल्यास त्यांना कार्यालयात अथवा इतरत्र भेटीला बोलावून नोकरीची हमी दिली जाते. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी, तसेच सर्विस चार्जच्या नावाखाली लाखो रुपये घेतले जातात. टेक्निकल करणे देवून काही दिवस जॉयनिंग ला वेळ लागेल असे सांगण्यात येते, यानंतर काही दिवसात ही कार्यालय आपला गाशा गुंडाळून पसार होतात. त्यावेळी लक्षात येत की लाखो करोडो पैशांची फसवणूक झाली आहे. असे एक नाही अनेक उदाहरण आहेत. रोजच कोणीनं कोणी यांच्या जाळ्यात अडकत असते. यात सतत काही नाव अधोरेखित होतात ते पुढीलप्रमाणे, नविको शिपिंग, ट्रान्सफॉर्म शिप मेनेजमेंट, ट्रयवे शिपिंग आणि सीमेन शिप मॉनेजमेंट. बरेच वेळेस हे कायद्याच्या कचाट्यात अडकून देखील यांच्यावर चाप बसत नाही, मग ते पुन्हा उजळ माथ्याने फसवणुकीचे धंदे निर्भीड पणे करतात. मग अश्या लोकाना नक्की अभय देत कोण? कोणाच्या आशीर्वादाने हे यांना हे फसवणुकीचे धंदे राजरोस चालवतात. याची चौकशी झाली पाहिजे, सत्य काय ते समोर आले पाहिजे आणि त्या बिचाऱ्या सिफेरर्सना एकतर पैसे तरी मिळयाव्यात किंवा नोकऱ्यातरी.
ऑल इंडिया सिफेरर्स यूनियन कडे अश्या अनेक तक्रारी येतात. यूनियन कडून शिपिंग क्षेत्रात होणाऱ्या गुन्हयांसाठी एक विशेष कक्ष तयार करण्याची मागणी गेले दीड वर्षापासून केली असून त्याचा अनेकदा पाठपुरावा सुद्धा करण्यात आला आहे, तरी सुद्धा अजून त्यात काही प्रगती दिसत नाही. वैश्विक महामारीच्या या भयानक काळात सुद्धा हा फसवणुकीचा बाजार अंदाधुंद चालू होता. एखादा भस्मासुरा प्रमाणे यांची न शमणारी पैश्यांची भूक दिवसेंदिवस वाढत चाली आहे. याला कुठे तरी चाप बसेल का? प्रशासन यांच्या मुसक्या कधी आवलेळ का? अशी उद्विग्न प्रतिक्रिया यूनियन चे अध्यक्ष संजय वासुदेव पवार, कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे आणि खजिनदार शितल मोरे व इतर पदाधिकारी व्यक्त करतात.
या शिपिंग कंपन्यांच्या पर्दाफाश करण्यासाठी ऑल इंडिया सिफेरर्स युनियन आणि मनसे नाविक सेनेच्या संयुक्त प्रयत्न केले जात होते. आज यात एक महत्वाचा सुत्रधार नेरूळ येथे हाती लागला आहे. हा इसम पाच शिपिंग कंपन्यांमध्ये काम पाहात होता. पुढील कारवाही करता त्याला पोलिसानंकडे FIR नोदवून सुपूर्द करण्यात आले आहे.
युनियन अध्याक्ष संजय वासुदेव पवार, कार्यध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे आणि मनसे नाविक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सविनय म्हात्रे, विशू सुदाला, विनोद पाखरे व कार्यकर्ते सहभागी होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close